नांदेडचे नुतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे

राज्य सरकारने 25 पोलीस अधीक्षकांना दिल्या नविन नियुक्त्या 

नांदेड,(प्रतिनिधी)-राज्य शासनाने पोलीस अधीक्षकांना नवीन नियुक्ती दिल्या आहेत. त्यात नांदेडच्या पोलीस अधीक्षक पदी श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कृष्ण कोकाटे या अगोदर सुद्धा काही दिवस नांदेडचे पोलीस अधीक्षक होते.

राज्य शासनाच्या गृह विभागाचे सचिव व्यंकटेश भट्ट यांच्या स्वाक्षरीने जारी झालेल्या आदेशात राज्यातील 25 पोलीस अधीक्षकांना नवीन नियुक्ती देण्यात आली आहे. त्यातील 19 पोलीस अधीक्षकांना प्रतीक्षेचा ठेवण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यासाठी नवीन पोलिस अधीक्षकपदी श्रीकृष्ण कोकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यासह 19 पोलीस अधीक्षक नवीन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

नवीन नियुक्तींमध्ये नवीन जिल्ह्यात पदस्थापना मिळालेले पोलीस अधीक्षक पुढील प्रमाणे आहेत धनंजय कुलकर्णी- रत्नागिरी, पवन बनसोड -सिंधुदुर्ग, बसवराज तेली- सांगली, शेख समीर असलम – सातारा,अंकित गोयल- पुणे ग्रामीण, शिरीष सरदेशपांडे – सोलापूर ग्रामीण, राकेश ओला- अहमदनगर,एम.राजकुमार- जळगाव,रागसुधा आर.- परभणी, संदीप सिंह गील- हिंगोली, सोमय विनायक मुंडे- लातूर, सारंग आव्हाड- बुलढाणा, गौरव सिंह- यवतमाळ, संदीप घुगे- अकोला, रवींद्रसिंह परदेशी- चंद्रपूर, नूरु हसन – वर्धा, निखिल पिंगळे- गोंदिया, निलोत्पल -गडचिरोली, संजय बारकुंड- धुळे, श्रीकांत परोपकारी- ठाणे शहर ,सचिन पाटील -गुन्हे अन्वेषण विभाग औरंगाबाद, यांच्यासोबत राज्यपालांचे एडिसी शिंगोरी विशाल आनंद यांना नागपूर ग्रामीण जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली आहे.

राज्यसेवेतील लक्ष्मीकांत पाटील यांना प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे नियुक्ती मिळाली आहे. तसेच पराग मनेरे यांना व्हीआयपी सुरक्षा मुंबई येथे नियुक्ती मिळाली आहे.

या बदल्या नंतर 19 पोलीस अधीक्षकांना प्रतीक्षेत ठेवण्यात आले आहे त्यात मोहित कुमार गर्ग, राजेंद्र दाभाडे ,दीक्षित कुमार गेडाम, अजय कुमार बंसल,अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रवीण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर,प्रमोद शेवाळे, अरविंद चावरिया,दिलीप पाटील भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे ,विश्वा पानसरे, प्रशांत होळकर, प्रवीण पाटील या आयपीएस अधिकाऱ्यांसह राज्यसेवेतील निकेश खाटमोडे यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे पत्रकार पुत्र आहेत,अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.त्यांचे वडील करमाड येथे पत्रकार होते असे सुत्रांनी सांगीतले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *