नांदेड(प्रतिनिधी)- आजारी असलेले भोकरचे अपर पोलीस अधिक्षक आज 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिनाच्या कार्यक्रमात हजर नव्हते. तेंव्हा याबाबत माहिती घेतली असता विजय कबाडे सध्या नॉट रिचेबल आहेत अशी चर्चा पोलीस मुख्यालयात होत होती.
दोन -तीन दिवसांपुर्वी आजारी असल्याची नोंद नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात करून भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे हे आजाराच्या उपचारासाठी नांदेड जिल्हा सोडून इतरत्र गेले होते. कोणत्या रुग्णालयात त्यांच्या आजारावर उपचार सुरू आहेत याची माहिती मात्र प्राप्त झाली नाही. आज 21 ऑक्टोबर 2022 पोलीस स्मृतीदिन म्हणून देशभर साजरा होतो. हा एक महत्वपूर्ण अभिवादनाचा कार्यक्रम असतो. ज्यामध्ये मागील वर्षात विरगती प्राप्त करणाऱ्या सशस्त्र दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभिवादन केले जाते. आज विजय कबाडे या कार्यक्रमात हजर नव्हते. या बद्दल माहिती घेतली असता सध्या विजय कबाडे नॉट रिचेबल आहेत असे सांगण्यात आले.
यापेक्षाही अधिकची खात्रीलायक माहिती अशीही प्राप्त झाली आहे की, त्यांच्या सेवेतील दोन जण नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले आहेत.इतर दोघांना त्यांनी स्वत: आजारी रजेचा मेमो फाडण्याअगोदर सुट्टीवर सोडलेले आहे. सध्या त्यांचा मोबाईल फोन बंद असल्याचे लोक सांगत होते. सोबतच भोकर अपर पोलीस अधिक्षक कार्यालयात सुध्दा फक्त एकच माणुस उपलब्ध असल्याची चर्चा पोलीस मुख्यालयात होत होती.
अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे नॉट रिचेबल