नांदेड(प्रतिनिधी)-मध्यरात्री 1 वाजता पोलीस उपनिरिक्षकाने घरी जा म्हटल्यानंतर त्या दोघांनी पोलीस निरिक्षकाचा गणवेश शर्ट पकडून त्यातील बटणे तोडल्याचा प्रकार महादेव मंदिर शिवनगर येथे घडला आहे.
विमानतळ येथील पोलीस उपनिरिक्षक प्रदीप भानुदास गौड यांची 20 ऑक्टोबर रोजी रात्री गस्त करण्याची ड्युटी होती. मध्यरात्रीनंतर 1 वाजता महादेव मंदिर शिवनगर येथे पोहचले असता रस्त्यावर थांबलेल्या कांही लोकांना घरी जाण्यास सांगितले. तेंव्हा मुन्ना ठाकूर आणि त्याच्यासोबत इतर एक अशा दोघांनी पोलीस उपनिरिक्षकाचे शर्ट पकडून ओडले आणि त्यातील बटणे तोडून टाकली. माझ्या नादी लागू नका नाही तर तुमच्या फॅमिलीला सोडणार नाही अशी धमकी दिली. सोबतच कशी ड्युटी करता असे पाहतो अशा धमक्या पण दिल्या. विमानतळ पोलीसांनी या प्रकरणी 358/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक आनलदास हे करणार आहेत.
पोलीस उपनिरिक्षकांचा गणवेश पकडून बटणे तोडली