नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी पदभार स्वीकारला

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील जनता,राजकीय मंडळी आणि पत्रकारानीं मला वेळो वेळी पोलीस जबाबदारीची जाणीव करून दिली.त्याच आधारावर मी माझ्या नांदेड सेवा काळाचे ७०३ दिवस पूर्ण केले आहेत असे माजी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी मला खूप मेहनत घ्यावी लागणार असल्याचे सांगितले.आज नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला.पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना कार्यालयाने निरोप दिला.तसेच नूतन पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले. याप्रसंगी सौ.सारिका शेवाळे आणि त्यांच्या सुपुत्री श्रावणी शेवाळे उपस्थित होत्या.
२० नोव्हेंबर २०२० रोजी नांदेड जिल्हा पोलीस दलाचा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार प्रमोद शेवाळे यांनी घेतला होता.त्यानंतर आलेल्या सर्व आव्हानांना समर्थपणे पेलत त्यांनी ७०३ दिवस कार्य केले.आज नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेडला आले.दोन्ही पोलीस अधीक्षकांचा एकत्रित पणे सन्मान करण्यात आला.
आपल्या सत्काराला उत्तर देतांना प्रमोद शेवाळे म्हणाले,मी नांदेडला आल्या नंतर या जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा आहे याची जाणीव करून घेतली.जिल्ह्यात कार्य करतांना जनता,राजकीय मंडळी आणि पत्रकारांनी वेळोवेळी मला माझी जबाबदारी समजून सांगितली.त्या आधारवर मी माझी सर्व शक्ती पणाला लावून काम केले. मला पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी प्रत्येक कामात केलेलं मार्गदर्शन महत्वाचे होते. आज मी नांदेड जिल्ह्याचा निरोप घेताना मागील ७०३ दिवसांच्या आठवणी सोबत घेऊन जाणार आहे.त्या आठवणी मला माझ्या उर्वरित पोलीस सेवा काळात महत्वपूर्ण ठरणार आहेत.आपल्या ७०३ दिवसांचा कार्यकाळ प्रमोद शेवाळे यांनी मांडताना अनेक प्रसंग सांगितले.
आपल्या आगमनाचा सन्मान स्वीकारतांना नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की,मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.मी माझे सर्वस्व लावून जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही याची दक्षता नेहमीच घेईल.

या कार्यक्रमात अपर पोललिस अधीक्षक निलेश मोरे,गृह पोलीस उप अधीक्षक डॉ.अश्विनी जगताप,पोलीस उप अधीक्षक चंद्रसेन देशमुख,विक्रांत गायकवाड,सचिन सांगळे, डॉ.सिद्धेश्वर भोरे,मारोती थोरात,पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,भगवान धबडगे,सुधाकर आडे,अनिरुद्ध काकडे,डॉ.नितीन काशीकर,जगदीश भंडरवार,अशोक घोरबांड,राखीव पोलीस निरीक्षक विजय धोंडगे,सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी लष्करे यांच्या सह अनेक अधिकारी,पोलीस अंमलदार,कार्यालयीन अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.अश्विनी जगताप यांनी केले.सूत्र संचलन विठ्ठल कत्ते यांनी केले.ऋण व्यक्त करण्याची जबाबदारी पोल्सी निरीक्षक प्रशांत देशपांडे यांनी पार पाडली.
प्रमोद शेवाळे यांनी केल्या पोलीस अंमलदाराच्या बदल्या
प्रमोद शेवाळे यांनी सन २०२२ च्या सर्वसाधारण बदल्या करून आपल्या पोलीस अंमलदारांना खुश केले.काल दिनांक २१ ऑक्टोबर २०२२ रोजी शेवाळे यांनी सहायक पोलीस उप निरीक्षक – ५६,पोलीस हवालदार- १६९,पोलीस नाईक – ९९ आणि पोलीस शिपाई -२७३ अश्या एकूण ५९७ पोलीस अंमलदाराच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये जास्त लोकांना आहे त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे.बदल्या करतांना सर्वाना समक्ष बोलावून पोलीस अमलदारांसोबत चर्चा करून बदल्या करण्यात आल्या आहेत.बहुतांश पोलीस अंमलदार या बदल्यांवर खुश आहेत.