नांदेड,(प्रतिनिधी)-नूतन पोलीस अधीक्षकांनी नांदेड जिल्ह्यातील ज्या पोलीस अंमलदारांचे नांव दिनांक 21 आॅक्टोबर रोजीच्या यादीत नाही, अशा पोलिसांना पुन्हा एकदा संधी दिली आहे.
22 ऑक्टोबर रोजी नांदेड जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. एक दिवस पूर्वी 21आक्टोंबर रोजी माजी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जवळपास 500 पेक्षा जास्त पोलिसांच्या बदल्या केल्या होत्या. जिल्ह्याचा कारभार स्विकारताच नूतन पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील पोलिस अंमलदारांना सांगितले आहे की,दिनांक 31 मे 2022 या तारखेपर्यंत ज्या पोलिस अंमलदारांना सध्याच्या नियुक्तीला पाच वर्ष आणि त्यापेक्षा जास्त काळ पूर्ण झालेला आहे.अशा सर्व पोलिस अंमलदारांनी आपण नियुक्तीस असलेल्या दिनांक सहची माहिती 25 ऑक्टोबर 2022 पर्यंत ई-मेल द्वारे किंवा बिनतारी संदेशाद्वारे पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर करायची आहे. जिल्ह्यातील ज्या पोलीस विभागांमध्ये अशा प्रकारे अर्ज करण्याबाबतची माहिती निरंक आहे. त्यांनी सुद्धा निरंक अहवाल पाठवायचा आहे.पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार कार्यालय अधीक्षक चंद्रकांत जाधव यांची या माहिती पत्रावर स्वाक्षरी आहे.यावरून नूतन पोलीस अधीक्षक आपल्या सहकारी पोलीसांवर बारकाईने लक्ष देणार हे दिसते.