नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड शहरात एक घरफोडून चोरट्यांनी 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला आहे. कंधार तालुक्यातील मुखेड ते पेठवडज रस्त्यावर एका कारला थांबून जबरी चोरी घडली आहे. हे दोन्ही प्रकार लक्ष्मीपुजनाच्या रात्रीचे आहेत.
नजीर खान हनुमियॉं पठाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 ऑक्टोबरच्या सकाळी 8 ते 25 ऑक्टोबरच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांनी आपले घर बंद केलेले होते.त्यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून कोणी तरी चोरट्यांनी आत येऊन कपाटातील 11 तोळे सोन्याचे दागिणे आणि 37 तोळे चांदीचे दागिणे तसेच रोख रक्कम असा एकूण 4 लाख 70 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरला आहे. मुखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक अनसापुरे अधिक तपास करीत आहेत.
प्रदिप शिवाजीराव नाकाडे हे 24 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 9.30 वाजेच्या दरम्यान ते, त्यांची पत्नी आणि दोन वर्षाची मुलगी असे सर्व दुकानाची पुजा करून कार क्रमांक एम.एच.26 व्ही.6117 मध्ये मुखेड ते पेठवडज रस्त्यावर प्रवास करत असतांना गणपती गडगम यांच्या शेताजवळ पेठवडज येथे चार माणसांनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. दोन्ही बाजूला दोन दुचाकी गाड्या उभ्या करून मारहाण केली. सोन्याचे लॉकेट, सोन्याची अंगठी, पत्नीचे मंगळसूत्र आणि एक मोबाईल असा 73 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. कंधार पोलीसांनी हा जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक आर.एस.पडवळ अधिक तपास करीत आहेत.
दिवाळीच्या रात्री एक जबरी चोरी, एक घरफोडी; 5 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास