नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस उपनिरिक्षक शाहुची चौकशी स्थानिक गुन्हा शाखेच्या अधिकाऱ्यांमार्फत न करता इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी कारण अनेक मोठ्या सराईत गुन्हेगारांशी पोलीस उपनिरिक्षक शाहुची पाळेमुळे जुळलेली आहेत अशा आशयाचा अर्ज इंदरजितसिंघ चरणसिंघ दफेदार यांनी पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांच्या कार्यालयात आज दिला आहे.
इंदरजितसिंघ दफेदार यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक जसवंतसिंघ शाहु आणि त्याचा सुपूत्र जयदिपसिंघ शाहु या दोघांविरुध्द गुन्हा क्रमांक 291/2022 दाखल करण्यात आला. हा गुन्हा 22 ऑक्टोबर रोजी दाखल झाला. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 294, 323, 506, 34 आणि भारतीय हत्यार कायदाचे कलम 3/25 जोडलेले आहे.
गुन्हा दाखल होवून तिसऱ्याच दिवशी स्थानिक गुन्हा शाखेने जावक क्रमांक 850/स्थागुशा/प्रा.चौ./5566 /2022 हे पत्र प्राप्त झाले. दफेदार यांच्या म्हणण्यानुसार जसवंतसिंघ शाहुने मला दाखवलेलेले त्याच्याकडील पिस्तुल सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसते आहे. मी 21 ऑक्टोबर रोजी घडलेला प्रकार घेवून इतवारा पोलीस ठाण्यात गेलो होतो. तेंव्हा मला वैद्यकीय तपासणी करून येण्यास सांगितले. मी 22 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय तपासणी करून पुन्हा गेलो तेंव्हा मी सांगितलेल्या शब्दांमध्ये बरेच शब्द पोलीस प्राथमिकीमध्ये लिहिलेले नाहीत. मी पोलीस आहे, या अगोदर सुध्दा खुप सारख्या प्रकरणांमध्ये माझे काही झाले नाही अशा धमक्या पण दिल्या होत्या.
इतवारा पोलीसांच्या मार्फत स्थानिक गुन्हा शाखेने झालेल्या घटनेच्या साक्षीदारांना हजर ठेवण्यासाठी मला पत्र पाठवले. आरोपी हा पोलीस अधिकारी आहे त्याच्या पदाचा दबदबा निर्माण करून चौकशी गुणवत्ता पुर्ण होवू देणार नाही. असलेल्या पुराव्यांना आणि साक्षीदारांवर दबाव निर्माण करून ते नष्ट करण्यात तो सफल होईल या करीता घटनेची चौकशी निपक्षपाती व्हावी म्हणून ही चौकशी स्थानिक गुन्हा शाखा नांदेडच्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली न करता इतर कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी तसेच चौकशी पुर्ण होईपर्यंत जसवंतसिंघ शाहुचे निलंबन करावे. कारण तो येता-जाता साक्षीदारांवर दबाव आणत आहे, त्याने पुरावे नष्ट केले आहेत, त्याची पाळेमुळे ही सराईत गुन्हेगाराशी आलेली असून तो त्यांच्याशी संगणमत करून आहे. त्यांचा तो या प्रकरणात उपयोग करण्याची शक्यता सुध्दा इंदरजितसिंघ दफेदार यांनी आपल्या अर्जात लिहिली आहे.
संबंधीत बातमी….
https://vastavnewslive.com/2022/10/22/स्थानिक-गुन्हा-शाखेच्या-6/