सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या नेतृत्वात पकडले 20 जुगारी

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनात बिलोली, रामतिर्थ आणि नायगाव पोलीसांनी एक संयुक्त कार्यवाही करून 28 ऑक्टोबरच्या पहाटे 4 ते 5 वाजेदरम्यान कासराळी गावात जुगार खेळणाऱ्या 20 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 4 हजार रुपये रोख रक्कम, 76 हजार रुपयांचे मोबाईल आणि 4 लाख रुपयांच्या 11 दुचाकी गाड्या असा एकूण 5 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कासराळी गावात जुगार चालत असल्याची माहिती बिलोलीचे सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांना मिळाल्यानंतर त्यांनी नायगावचे पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे, रामतिर्थचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे यांना या ठिकाणी नियोजनबध्दरितीने धाड टाकण्यास सांगितले. त्या ठिकाणी 20 जण 52 पत्यांचा जुगार खेळत होते. तेथून पोलीसांनी 20 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुध्द बिलोलीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामदास केंद्रे यांच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) नुसार गुन्हा क्रमांक 217/2022 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार गोविंद शिंदे करीत आहेत.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक संकेत दिघे, पोलीस उपनिरिक्षक बाचावार, पोलीस उपनिरिक्षक शिंदे, पोलीस अंमलदार गंगाधर केंद्रे, मुस्तापुरे, देगलूरकर, आडे, शिंदे, गाजुलवार, सोनकांबळे, ईबितवार, रिंदकवाले, मुदीराज आदींचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *