नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद भागातील वीज वितरण कार्यालयातील उपअभियंता वेगवेगळ्या पध्दतीने सुपाऱ्या घेऊन काम करत असल्याचे एका घटनेवरुन समोर आले. ऐन दिवाळीच्या दिवशी एका घराची विद्युत खंडीत करण्यात आली. आज या घटनेला पाच दिवस होत आहेत. तरी पण तो विद्युत पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. याबद्दल कोणी-कोणी हात ओले केले याची चर्चा आता व्हायला सुरू झाली आहे.
वजिराबाद भागातील एक जुने घर एका व्यक्तीने खरेदी केले. पण त्या घरात राहणारा व्यक्ती हा मागील 40 वर्षापासुन त्याला वास्तव्य करतो त्याला कोणतीही बाब न विचारता नवीन घर मालकाने जुन्या घरमालकाकडून घर खरेदी केले. त्याची रजिस्ट्रीपण झाली. पण त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीचा विद्युत पुरवठा कसा खंडीत करता येईल याचे एक नियोजन वजिराबादच्या वीज वितरण उपअभियंता कार्यालयात झाले. उपअभियंता कार्यालयात सन्माननिय श्री. देशमुख हे उपअभियंता आहेत. अगोदर त्या किरायाच्या घराचे विद्युत मीटर नवीन मालकाच्या नावे करण्यात आले. त्यानंतर नवीन मालकाचा अर्ज घेवून ऐन दिवाळीच्या दिवशी त्या घराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. वजिराबादमधील लोक सांगतात हे सुपारी घेवून केलेले काम आहे. उपअभियंता देशमुख यांनी आज प्रत्येक माणसासाठी विद्युत ही अत्यावश्यक गरजेची असतांना विद्युत पुरवठा खंडीत करून केलेली कार्यवाही म्हणजे अत्यंत सन्माननिय असल्याची चर्चा वजिराबाद भागात होत आहे.
या प्रकरणात किरायदार व्यक्तीने पोलीसांकडे सुध्दा धाव घेतली होती. तेथे झालेल्या चर्चेनंतर देशमुखांनी मी विद्युत पुरवठा सुरू करतो असे सांगितले होते. पण आज वृत्तलिहिपर्यंत तरी या घराचा विद्युत पुरवठा सुरु झालेला नाही या मागील काय गमक आहे हे तर उपअभियंता देशमुखच सांगू शकतील.
विज वितरण कार्यालय वजिराबादचा सुपारी घेवून विद्युत खंडीत करण्याचा नवीन कारभार