घटनात्मक पद्धतीने निवडून दिलेले प्रतिनिधी शिवरायांचे नाव घेत गोहाटीला पळाले. लोक आणि राज्यघटना यापलीकडील महाशक्तीचा शोध लागला. सध्याची युती, आघाडी,…,ही मॉडेल्स अपुरी आहेत. पर्यायी मॉडेलची मांडणी करून मी श्री बच्चू कडू यांचे सोबत राबवायला सुरुवात केली होती. बच्चू कडू हे महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता असलेले एक सेक्युलर व गरिबांची सेवा करणारे कळवळा असलेले नेते आहेत. अनेक बैठका झाल्या ते अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्या जिल्ह्यात ही योजना राबवायला सुरुवात केली आणि बच्चू कडू देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोन कॉलवर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी गेल्याचे समजले. सामान्य माणसाला राजकीय गुंतागुंत समजत नाही हे खरे आहे मी स्वतः 2014 सालची बारामती लोकसभा निवडणूक लढवल्याने व आजही सक्रिय असल्याने थोडीफार समज आली असे वाटते. यापूर्वी देवेंद्रजींनी कुणाकुणाला पळायला लावले?
‘एका फोन कॉलवर पळायला लावणारा आधुनिक परशुराम देवेंद्र’
*आमचे अजित दादा हे एक मेहनती,आक्रमक, महत्त्वकांक्षी नेते आहेत. स्वतःला टग्या म्हणविणारे दादा देवेंद्रच्या पालखीचे भोई झाले आणि शपथविधी केला. ज्या आदरणीय पवार साहेबांच्या मुळे ते मोठे बनले त्यांना देखील कल्पना येणार नाही अशा पद्धतीने.
*भारतात पहिला सहकारी साखर कारखाना आणणारे पद्मश्री विखे, आदर्श शेती करणारे मोहिते, महाडिक …..शेतकऱ्यांची पोरे, नातू पणतू हातामध्ये झांज घेऊन देवेंद्र भोवती नाचताना दिसतात.
*स्वतःला आदिवासी, महार ,मांग …
म्हणून घेणारे नेते, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेणारे आठवले सारखे नेते आज सदाशिव पेठी भाषेत देवेंद्र चे गीत गातात.
*सातारा कोल्हापूर गादीचे वारसदार हे भालदार चोपदार प्रमाणे देवेंद्र पुढे उभे राहत पदाची मागणी करताना दिसतात.
*आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासले म्हणून मागणी करणारे तरुण प्रशासनात गेल्यावर त्यांचे ब्राह्मणायझेशन झालेले दिसते. आपल्या जात भाईंना ओळख द्यायला तयार नाहीत पण देवेंद्र साठी मान डोलावतात.
अशी कोणती क्षमता ,ताकत देवेंद्र मध्ये आहे बरे? महाराष्ट्रात परिवर्तन घडवून आणणारी एखादी चळवळ, संस्था त्यांनी उभी केल्याचे एकही उदाहरण नाही.देवेंद्रचा दृष्टिकोन, ध्येय, अजेंडा पक्का ठरलेला आहे. ब्राह्मणी सनातनी धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी ब्राह्मण श्रेष्ठत्व कायम राखणारी वर्णव्यवस्था बळकट करणे, ब्राह्मणी धर्म संस्था ही राज्यसंस्थे पेक्षा श्रेष्ठ आहे हे सिद्ध करणे. हे काम पूर्ण करण्यासाठी ब्राह्मणी धर्म मानणारे त्यांच्या पाठीशी आहेत.प्रशासनामध्ये अनेक उघड, छुपे देवेंद्र कार्यरत आहेत. आणि हे काम गेले दोन हजार वर्ष चालू आहे
*देवेंद्र आणि मंडळी वेगळे आहेत का?
*60 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेत एका चिंपांझी जातीच्या माकड मादीला पिल्ले झाली. ती पुढे उत्क्रांत होत गेली. तीच ती देवेंद्र ,मी आणि आपण सर्वांची मूळ आजी. देवेंद्र ला सत्वगुणी, देवयोनी, ब्राह्मण वर्णीय व कितीही भ्रष्ट असला तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ असा ब्राह्मण कोणी बनविला? तो आदी पुरुषाच्या मुखातून आलेला नाही. निसर्गाने जैविक(biological)पद्धतीने बनलेला नाही . तो कृत्रिम मानसिक(psychological)विचारावर बनविलेला आहे. पण हे सगळे लिखित स्वरूपामध्ये देवेंद्रजीच्या पूर्वजांनी आमच्या मूळ धर्मग्रंथात घुसडल्याने ते आमच्या अबोध मनात पक्के बिंबलेले आहे.
* उदाहरणार्थ, ‘100 वर्षाचा क्षत्रिय आणि दहा वर्षाचा ब्राह्मण हे पिता-पुत्राप्रमाणे समजावेत यात ब्राह्मण …. होय! यात बाप कोण? आणि मुलगा कोण?’ काय उत्तर असेल?
‘दहा वर्षाचा ब्राह्मण हा बाप/ पिता होय !’ इति मनुस्मृती अध्याय 2 ओवी34.
* आजही आपण देवेंद्रजीचे पालखीचे भोई का बनतो ? ते थांबवण्यासाठी इलाज काय ?
* प्रचलित ‘राजकीय प्रशासकीय’ मॉडेलमध्ये नाविन्यपूर्ण ‘सुधारणा(reforms)’ शोधून राबविणे हा त्यावरचा उपाय ठरू शकतो.
* आज पर्यंत दोन मूलभूत सुधारणा देशात राबवलेल्या आहेत. ‘देशाला स्वातंत्र्य’ मिळाले ही पहिली सुधारणा होय.
*’राज्यघटना’ अस्तित्वात आली ही दुसरी सुधारणा होय. असे असूनही देवेंद्र व मंडळी पुरानातील परशुरामाप्रमाणे समाज व्यवस्था खच्ची करण्यामध्ये प्रभावी का? आज सुद्धा प्रत्येक हिंदू भारतीयांच्या वर्तनावर 70 टक्के मनू स्मृतीचा प्रभाव आहे. आम्हा लोकांच्या हातात आधुनिक विचारावर आधारित राज्यघटना दिली. मात्र आमचा मेंदू, संस्कार, विचार जुने पुरातन आहेत. आणि राज्य घटनेतील विचार नियम आधुनिक आहेत. जुन्या यंत्राला आधुनिक नवा भाग जोडला. जुना आणि नवा या भागामध्ये असलेल्या प्रचंड तफावत, विरोधाभास यामुळे समाज व्यवस्थेमध्ये विस्कळीतपणा(misalignment) निर्माण झाला आहे. विस्कळीतपणा घालविण्यासाठी नावीन्यपूर्ण सुधारणा शोधून राबविणे हा त्यावरचा उपाय ठरतो. हीच ती ‘तिसरी सुधारणा’ होय.
* आमचा मेंदू 70% देवेंद्र ची मनुस्मृतीने आणि 30 टक्के राज्यघटनेने व्यापलेला आहे. विचारानुसार वर्तन घडते. त्यामुळेच साद घातली की देवेंद्र ला अपेक्षित असलेला प्रतिसाद मोठा मिळतो. संपूर्ण राज्यघटनेच्या तत्त्वांचा कोणीच उपयोग करत नाही. मात्र राज्यघटनेचे लचके तोडण्याचे काम जो तो आपली गरज, कुवत, आक्रमकता, क्रूरता यानुसार करीत असतो.
* म्हणून आज गरज आहे ती ‘ तिसरी सुधारणा’ आणून राबविण्याची!
मनुस्मृतीचे जुने विचार आणि राज्य घटनेतील आधुनिक विचार यांच्यामधील विरोधाभासामुळे समाज व्यवस्थेमध्ये निर्माण झालेला विस्कळीतपणा कमी करत काढून कसा टाकायचा याचे मॉडेल मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे . माझ्याच खोपडीत फार अक्कल भरली असा माझा मुळीच दावा नाही. पण कुणीतरी ते मांडायला पाहिजे. तू नाही तर कोण? असा प्रश्न विचारला तर? इतरांकडे बोट दाखवण्यापेक्षा मी ती सुधारणा ‘अठरा पगड मावळे शिवशाही’ मॉडेल या शीर्षकाखाली मांडलेली आहे.
पुस्तक: नवी दिशा
अठरापगड मावळे शिवशाही
चेहरे नको व्यवस्था बदलूया
लेखक: सुरेश खोपडे निवृत्त आयपीएस
स्नेह प्रकाशन (7 एप्रिल 2019)
सदर पोस्ट परिस्थितीजन्य संशोधनावर आधारित असल्याने हा संशोधनात्मक लेख आहे. कोणाचाही अपमान, उपमर्द करण्याचा हेतू नाही. मात्र माहिती चुकीची आढळल्यास त्याची जबाबदारी माझी राहील.
-सुरेश खोपडे