स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून पाच चोरीच्या दुचाकी केल्या जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून 2 लाख किंमतीच्या 5 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हा शाखेच्या या कारवाईमुळे वजिराबाद पोलीस ठाण्यातील दोन, भाग्यनगर आणि विमानतळ पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे दुचाकी चोरीचे चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
नांदेड जिल्ह्यातून अनेक ठिकाणाहून दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण मोठे आहे. स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि सहायक पोलीस निरीक्षक पांडूरंग माने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, पोलीस अंमलदार रूपेश दासरवार, पदमसिंग कांबळे, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, रणधीर राजबन्सी, सायबर विभागातील पोलीस अंमलदार राजू सिटीकर, दिपक ओढणे आणि शंकर केंद्रे यांनी नांदेड शहरातील उत्तर भागातील शेवटच्या टोकापासून केशव पवन मालपाणी वय 20, रा. बार्शी जि. सोलापूर, ह.मु. गुरूनगर, नांदेड, विश्वास परमेश्वर शिंदे वय 20, रा. एमजीएम कॉलेजसमोर नांदेड या दोघांना पकडले. त्यांच्याकडे चोरीच्या पाच दुचाकी गाड्या किंमत 2 लाख रूपये असा ऐवज सापडला. यामुळे पोलीस ठाणे वजिराबाद येथील गुन्हा क्र. 351/2022 आणि 391/2022, पोलीस ठाणे भाग्यनगर येथील गुन्हा क्र. 271/2022, पोलीस ठाणे विमानतळ येथील 363/2022 उघडकीस आले आहेत. या चोरट्यांना पुढील कारवाईसाठी त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *