नांदेड(प्रतिनिधी)- भारत जोडो पदयात्रेनिमित्त अनेक रस्ते बंद आहेत. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी तात्पुरते बसस्थानक वसरणी येथे उभारले आहे. प्रवाशांनी या नवीन बसस्थानकावर जावून आपल्या गाड्या पकडाव्यात असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
विभाग नियंत्रक राज्य महामार्ग परिवहन महामंडळ यांनी जारी केलेल्या प्रेसनोटनुसार 10 नोव्हेंबर रोजी भारत जोडो पदयात्रेनिमित्त वसंतराव नाईक कॉलेज मैदान, डेअरी चौक वसरणी येथे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले आहे.10 नोव्हेंबर रोजी शहरात होणाऱ्या गर्दीला पाहुन बरेच रस्ते वाहतुकीसाठी पोलीस प्रशासनाने बंद केले आहेत. त्यासाठी तात्पुर्त्या बसस्थानकाची सोय करण्यात आली आहे.
लोहा-सोनखेडकडे जाणारी व येणारी वाहतुक डॉ.आंबेडकर चौक-विष्णुपूरी या मार्गाने होणार आहे. मुखेड-देगलूर-बिलोलीकडे जाणारी व येणारी वाहतुक किवळा-शिराढोण-तेलूरफाटा-कौठा या मार्गाने करण्यात येणार आहे. भोकर-किनवट-हदगाव-माहूर -हिंगोली-वसमतकडे जाणारी व येणारी वाहतुक लातूर फाटा(धनेगाव चौक), वळण रस्त्याने डॉ.शंकरराव चव्हाण चौक-आसनापुल या मार्गाने करण्यात येणार आहे. दि.10 नोव्हेंबर रोजीच्या तात्पुर्त्या बसस्थानकासाठी प्रवासी मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यावतीने प्रवाशांना मदत होणार आहे. या तात्पुर्त्या बसस्थानकाची माहिती लक्षात ठेवून प्रवाशांनी त्याचा उपयोग घ्यावा असे आवाहन विभाग नियंत्रकांनी केले आहे.
10 नोव्हेंबरसाठी वसरणी येथे तात्पुर्ते बसस्थानक