मकोका कायद्यातील आरोपी विनोद दयाळू दिघोरेला हतकड्यांपासून मिळाली सवलत

नांदेड(प्रतिनिधी)-मकोका कायद्यात आरोपी असलेल्या पोलीस निरीक्षक विनोद दयाळू दिघोरेला आज बिना हतकडी लावता न्यायालयात आणण्यात आले होते. या प्रकरणातील इतर सर्व आरोपींना मात्र हतकड्या लावण्यात आल्या होत्या. विनोद दयाळू दिघोरेला ही सवलत कशी प्राप्त झाली याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला मात्र तो शोध पुर्ण होवू शकला नाही.
सन 2016 मध्ये कॉंगे्रस नगरसेवक गोविंद कोकुलवार यांच्यावर बंदुकीने हल्ला झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले. आजही ते परावलंबीच आहेत. याप्रकरणी त्यांचे पुत्र नागेश कोकुलवार यांच्या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 176/2019 दाखल झाला होता. या गुन्ह्यात सुरूवातीला भारतीय दंड संहितेचे कलम 307 हे सर्वात मोठे कलम होते. या प्रकरणात एक-एक करत आरोपींची दुकान इतवारा पोलीसांनी लावली. त्यानंतर इतवारा पोलीसांनी या गुन्ह्यात मकोका कायदा जोडला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास इतवाराचे तत्कालीन पोलीस अधिक्षक धनंजय पाटील यांच्याकडे वर्ग झाला. उपलब्ध असलेल्या तपासातील पुराव्याच्या आधारावर धनंजय पाटील यांनी सन 2020 मध्ये वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर या गावात पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या विनोद दयाळू दिघोरेला अटक केली. आजही ते न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहेत. अनेक प्रयत्न करून सुध्दा न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला नाही.
आज या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयात आणले होते. यामध्ये एक आरोपी विनोद दयाळू दिघोरे हा आहे. या आरोपींच्या गराड्यात फक्त एकाच विनोद दिघोरेलाच हतकड्या लावलेल्या नव्हत्या. मकोका कायद्या ज्या गुन्ह्यात जोडला गेला. त्या गुन्ह्यातील आरोपी हे गंभीर आरोपी आहेत असे मानले जाते. मग विनोद दयाळू दिघोरेला कोणत्या आदेशाने हतकड्या लावल्या नाहीत याचा शोध सुध्दा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे उत्तर सापडले नाही. या बिनहातकड्यांचे फोटो अनेक लोकांनी काढलेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *