दरोडा टाकून पळणारे चोरटे पडले कॅनॉलमध्ये जनतेने पोलीसांच्या ताब्यात दिले

नांदेड(प्रतिनिधी)-एका दुचाकी चालकाला लुटून पळून जाणाऱ्या कर्नाटक राज्यातील बिदर येथील दोघांना जनतेने किवळा-वडेपुरी मार्गावर पकडले. सोनखेड पोलीसंानी त्यांना अटक केली आहे.
दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते 10.30 या वेळेदरम्यान साईनाथ गणपतराव टरके हे शेतकरी आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.एस.0891 वर बसून शेताकडे जात असतांना किवळा वडेपुरी रस्त्यावर कॅनॉल रोडकडून दोन जण एका बिना नंबरच्या दुचाकीवर आले. त्यांनी टरके यांना थांबण्याचा इशारा करून थांबवले आणि तेंव्हा त्या दोघांनी टरके यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून तुझ्याकडे काय आहे ते काढ असे सांगत त्यांच्याकडून 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि 800 रुपये रोख रक्कम आणि 30 हजार 800 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरला. घटना घडली ती गावातील इतर तिन लोकांनी पाहिली त्यांनी आपल्या दुचाकीवरून या दरोडेखोरांचा पाठलाग केला. तेंव्हा दरोडेखोर कॅनॉलमध्ये पडले. याप्रसंगी गावकऱ्यांनी या दरोडेखोरांना पकडून सोनखेड पोलीसांना माहिती दिली. सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले आणि पोलीस अंमलदार राणबा फड यांनी जनतेच्या ताब्यातून घेतलेल्या लोकांची नावे मेहंदी हसन बाबर अली(43), जावेद जाफरी बाली अली (37) व्यवसाय धातूच्या अंगठ्या विक्री करणे रा. चिदरी रोड, हुसेनी कॉलनी, बिदर राज्य कर्नाटक असे आहे. सोनखेड पेालीसांनी या दोघांविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 394, 34 नुसार गुन्हा क्रमांक 164/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल भोसले हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *