नांदेड (प्रतिनिधी)- दि. 21 नोव्हेेंबर रोजी पोलीस ठाणे विमानतळच्या हद्दीत वलीमा (स्वागत समारोह) कार्यक्रमात बंद केलेला डीजे सुरू करण्याच्या वादातून सात जणांनी एका 22 वर्षीय युवकाचा खून केला. त्यातील चार जण विमानतळ पोलिसांच्या ताब्यात आहेत.
शेख इकबाल शेख जैनोद्दीन रा. कर्मवीरनगर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कर्मवीरनगरमध्ये वलीमा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात डीजे लावलेला होता, परंतु कायद्याच्या दृष्टीकोनातून तो डीजे विहीत वेळेत बंद करण्यात आला. डीजे बंद का केला, आम्हाला अजून नाचायचे आहे, डीजे लावून द्या यातून वाद झाला आणि शेख मोईन शेख इकबाल या 22 वर्षीय युवकावर सोहेल खान नवीद खान, आमू उर्फ आमेर शेख पाशा, मोहम्मद जाकेर, मोहम्मद ईस्माईल उर्फ चोली, मोहम्मद कैफ आणि सय्यद सादीक अशा सात जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात शेख मोईन शेख इकबालचा मृत्यू झाला.
या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्र. 399/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 302 आणि इतर नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिरूद्ध काकडे यांच्याकडे देण्यात आला आहे. घटना घडताच विमातनळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नरसिंह आनलदास, बाळू गित्ते, पोलीस अंमलदार बाबा गजभारे, दारासिंग राठोड, दत्तात्रय गंगावरे, बंडू कलंदर आणि इतरांनी त्वरीत प्रभावाने सात मारेकऱ्यांपैकी चौघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
शेख जाकेरने सहा सहकाऱ्यांसह 22 वर्षीय युवकाचा केला खून