नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील गोदावरी काठावर असलेल्या उर्वशी मंदिराजवळील एका दर्ग्याच्या परिसरात 30 वर्षीय युवकाचा खून झाला. या गुन्ह्यातील मारेकऱ्यांना पळवून लावणाऱ्यांमध्ये पोलीसांचा सहभाग असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.या आरोपींमध्ये एका आरोपीचे टोपन नाव वकील आहे.
21 नोव्हेंबर रोजी गोदावरी नदीकाठी डंकीनजवळ एका दर्ग्याहसमोर स्वप्नील शेषराव नागेश्र्वर (30) या युवकाचा मृत्यदेह सापडला. दुसऱ्या दिवशी त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज काही संकेतस्थळांवर व्हायरल झाले. याप्रकरणी स्वप्नीलचे वडील शेषराव नागेश्र्वर यांच्या तक्रारीवरुन विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कारण स्वप्नीलला विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून महिलेसह या मारेकऱ्यांनी डंकीनजवळ आणले होते. मारेकऱ्यांनी या प्रकरणात त्या महिलेची पण बरीच बेअब्रु केली आणि आम्हीच समाजाचे ठेकेदार आहोत या अर्भिभावात स्वप्नील नागेश्र्वरचा खून केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये 8 ते 10 जण दिसतात. यापैकी काही मारेकरी पोलीसांचे नातलग आहेत. त्यातील सर्व पोलीसांनी आपल्या नातलगांना पळवून लावल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त होत आहे. घडलेला हा प्रकार अत्यंत गंभीर असून आपल्या समाजाने केलेल्या चुकांना पांघरण घालत आपल्या समाजाविरुध्द स्वप्नीलने काम केले या भावनेतून हा खून झाला होता. भारतीय संविधानाने कायद्यासमोर सर्वांना एकच दर्जा दिला असतांना असे घडणे हा समाजासाठी घातक प्रकार आहे. तसेच गुन्हे करणाऱ्यांना पळवून लावण्यात मदत करून पोलीसांनी आपल्या गणवेशावर डाक लावण्याचा प्रकार केला आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. स्वप्नीलच्या मारेकऱ्यांमध्ये एका मारेकऱ्याचे टोपन नाव वकील असे आहे.
स्वप्नील नागेश्र्वरच्या मारेकऱ्यांना पळविण्यात काही पोलीसांचा हात ?