नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील शर्मा ट्रॅव्हल्सच्या गाडी चालकाने चुकीच्या दिशेने गाडी चालवून एका कु्रझर गाडीला धडक दिल्याचा प्रकार 22 जूनच्या सायंकाळी 4.30 वाजता घडला.
सिताराम दिलीपराव राखेवार रा.डोंगरगाव ता.मुदखेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते आपली गाडी क्रमांक एम.एच.29 आर.7852 चालवून लातूरफाटाकडे जात असतांना चुकीच्या दिशेने गाडी चालवत शर्मा ट्रॅव्हल्सची गाडी क्रमांक एम.एच.26 एन.6330 आली आणि त्यांनी कु्रझर गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेने कु्रझर गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्यांनी माहिती दिली की, शर्मा ट्रॅव्हल्सच्या गाड्या नेहमीच अशा प्रकारे चुकीच्या दिशेने चालवल्या जातात. आज अपघात घडल्यामुळे ही बाब अभिलेखात आली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी या प्रकरणी शर्मा ट्रॅव्हल्सच्या चालकाविरुध्द गुन्हा क्रमांक 415/2021 कलम 379,427 भारतीय दंडसंहितेनुसार दाखल केला असून पोलीस अंमलदार एन.जी.सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
रॉंगसाईडने आलेल्या शर्मा ट्रॅव्हल्स गाडीने कु्रझरला धडक दिली