नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील भावसार चौकात चोरट्यांनी एक एटीएम फोडून 25 लाखाची रक्कम गायब केल्याचा प्रकार सूर्योदय होताच लक्षात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार चोरी प्रकरणाचा अभ्यास करत आहेत.
नांदेड शहरातील मालेगाव रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर भावसार चौक आहे. भावसार चौकात एसबीआय शाखेचे एटीएम आहे. 24 तारखेच्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास फक्त सहा मिनिटाच्या कालखंडात चोरट्यांनी एक बोलेरो पिक
अपला एटीएम बांधून त्याला पिकअप गाडीच्या ताकदीने ओढले . गाडीच्या ताकतीने उरलेले एटीएम सहा मिनिटातच बाहेर आले. चोरट्यांनी ते एटीएम त्या पिकप गाडी टाकून पूर्णा रोड कडे गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, पोलीस उपाधीक्षक डॉ. सिद्धेश्वर भोरे, शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याचे डीबी पथक, आणि गुन्हा शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. चोरी केलेल्या पद्धतीचा अभ्यास वृत्त लिहीपर्यंत सुरू आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाने हिंगोली लातूर परभणी बीड आदी जिल्ह्यांना बिनतारी संदेश यंत्रणेवर संदेश पाठवून त्यांच्या भागात नाकाबंदी लावून पिकअप गाडीला ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या आहेत. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एटीएम बॉक्स सोडून देणाऱ्या चोरट्यांनी आज पहाट होण्याअगोदर जवळपास 25 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. याबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आणि यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की चोरट्यांचा मग पोलीस लवकरच काढेल.