
नांदेड(प्रतिनिधी)-भाऊ तोरसेकरविरुध्द भारतीय दंड संहितेतील कलम 124 अ प्रमाणे राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा असे निवेदन आंबेडकरवादी पक्ष संघटनांनी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे दिले आहे.
भारतातील हजारो वर्षाच्या गौरवशाली ईतिहासाच्या विविध पैलूंमध्ये वर्तमान संदर्भात लोकशाही शासन व्यवस्थेच्या ईतिहास सुध्दा फार प्राचीन आहे. भारतीय संविधान निर्मिती आणि लोकशाही ही सर्व जगात सर्वोत्तम शासन प्रणाली आहे असे मानले जाते. देशात लोकशाही असणे हा तेथील नागरीकांचा सर्वात मोठा अधिकारी आणि हक्क आहे. भारतीय लोकशाहीत राष्ट्रीय एकता व अखंडता सुनिश्चित करणाऱ्या संकल्पनेच्या विरोधात असणारे व्यक्तव्य निसंधीग्धरित्या संवैधानिक मुल्यांच्या विरोधात जावून भाऊ तोरसेकर या व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणजे देश विरोधी अपराध आहे. भारतीय दंड संहितेतील कलम 121 ते 130 मध्ये असे अपराध येतात. भाऊ तोरसेकरने केलेल्या वक्तव्याबाबत त्याच्यावर उपासात्मक कार्यवाही केली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा भारतीय दंड संहितेतील कलम 124(अ) नुसार करावा असे आवाहन या निवेदनात केले आहे. पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे निवेदन देण्यापुर्वी या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह महात्मा फुले पुतळा येथे धरणे आंदोलन केले आणि नंतर त्याच ठिकाणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक डॉ.नितीश काशीकर यांना निवेदन दिले.
या निविदेनावर प्रा.राजू सोनसळे, प्रतिक मोरे, ऍड. यशोनिल मोगले, राहुल चिखलीकर, संदीप मांजरमकर, राहुल सोनसळे, भिमराव बुक्तरे, अतिश ढगे, अंकुश सावते, केशव कांबळे, विजय भंडारे, प्रशांत गोडबोले, सुनिल सोनसळे, साहेबराव गजभारे, डॉ.गौतम कापुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
