नांदेड(प्रतिनिधी)-दोन मुलांचे भांडण सोडविण्याच्या प्रयत्नात एका 60 वर्षीय व्यक्तीने केलेली मेहनत त्याच्या अंगलट आली एका मुलाने तु मला थापड का मारला होतास असे सांगत त्या 60 वर्षीय व्यक्तीवर जिवघेणा हल्ला करून त्यास गंभीर जखमी केले.
अमीर खान नवाज खान पठाण हे 60 वर्षीय व्यक्ती मुदखेड तालुक्यातील न्याहळी गावाचे रहिवासी आहेत. 29 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजेच्यासुमारास न्याहळी गावात दोन युवक आपसात भांडत असल्याचे चित्र अमीर खान पठाण यांनी पाहिले. त्यावेळी अमीर खान यांनी त्यांच्या भांडणात हस्तक्षेप करत दोघांना एक-एक थापड मारली आणि तेथून चालते केले. त्यानंतर आकाश अंकुश गिरी या युवकाने अमीर खानला फोन करून बोलावले आणि तु मला थापड का मारलास असे विचारून चाकुने त्यांच्या पोटात घाव करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 238/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 206, 504 नुसार दाखल केला असून पोलीस निरिक्षक महेश शर्मा या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
