
नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या नवऱ्याला आपला प्रियकर आणि मित्रांसह मिळून पळवून नेऊन मारहाण करणाऱ्या महिलेसह तिचा प्रियकर आणि मित्र अशा पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम.बिरहारी यांनी 4 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
कर सल्लागार असलेले प्रकाश तुकाराम श्रीरामे आणि त्यांची पत्नी गितांजली यांच्यात झालेल्या वादानंतर त्यांचे कौटूंबिक संबंध बिघडले आणि पत्नी गितांजलीने चार जणांसह मिळून नवरा प्रकाश श्रीरामे यांचे अपहरण केले आणि त्यांना मारहाण करून रस्त्यावर सोडून दिले. भाग्यनगर पोलीसांनी अत्यंत फिल्मीस्टाईलने या प्रकरणाचा दोन तासात छडा लावला आणि नवऱ्याला किडनॅप करणारी बायको आणि तिच्या चार साथीदारांना दोन तासात जेरबंद केले. ही कामगिरी पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार प्रदीप गर्दनमारे आदींनी केली. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे यांच्याकडे आहे.
आज दुपारी सुनिल भिसे त्याचे सहकारी पोलीस अंमलदार प्रदीप गर्दनमारे, किशोर हुंडे, सय्यद अंमजद, हनमंता कदम आदींनी न्यायालयात हजर केले. न्यायालयात पोलीसांनी मांडलेला युक्तीवाद मान्य करत न्यायधीश बिरहारी यांनी गितांजली प्रकाश श्रीरामे आणि प्रकाश श्रीरामे यांनी फिर्यादीत लिहिलेले नाव गितांजली पि.बळवंत हाके(35), तिचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव(28), दिलीपसिंग हरीसिंग पवार (29), अवतारसिंघ नानकसिंघ रागडीया(38) आणि अमोल गोविंद बुक्तरे या चौघांना 4 डिसेंबर 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
गितांजली विधी पदवीधर आहे म्हणे….
एक वर्षाअगोदर एका कॉफी शॉपचे उद्घाटन झाले होते. हे बालाजी शिवाजी जाधव या आरोपीचे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी पुण्याचे दोन गोल्डमॅन आले होते. या कार्यक्रमातील गितांजलीची मुद्रा पाहिली तर ती मालकीणच वाटत आहे. काही जणांनी सांगितले त्या कार्यक्रमात डी.जे. वाजत होता तेंव्हा पोलीस आले त्यावेळी काही मंडळी चर्चा करत होती की, गितांजली न्यायाधीश आहे आता पोलीसांची वाट एका मिनिटात लावते पण आज ती दुर्देवाने त्याच पोलीसांच्या ताब्यात आरोपी या सदरात उभी आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधीशाखेची पदवी सुध्दा घेतलेली आहे पण हे फक्त सांगण्यातला विषय आहे प्रत्यक्षात ती विधी पदवीधर आहे की नाही यासाठी कोणाला तरी तिची विधी पदवी पाहायला हवी पण ती काही उपलब्ध झालेली नाही. बालाजी शिवाजी जाधवची ख्याती तर भाग्यनगर पोलीस रंगवून रंगवून सांगतात असा आहे हा एकूण प्रकार.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/12/02/नवऱ्याला-किडनॅप-करणारी-म/