नांदेड(प्रतिनिधी)-सध्या परिक्षा सुरू असून नांदेड शहरातील एका महाविद्यालयात काल दि.2 डिसेंबर रोजी झालेल्या वाणिज्य शाखेतील परिक्षेदरम्यान या वर्षीचा प्रश्न पत्र सोडून जुना प्रश्न पत्र विद्यार्थ्यांना देण्यात आला. काही वेळानंतर ही बाब उघड झाली. तेंव्हा त्या विद्यार्थ्यांना नवीन प्रश्न पत्र देवून विद्यार्थ्यांची परिक्षा पुन्हा घेण्यात आली. यानंतर झालेल्या वादात सध्या महाविद्यालयाची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. विद्यार्थ्यांसमोर प्राध्यापक आणि त्यांचे सहकारी क्षमा मागत आहेत.
काल दि.2 डिसेंबर रोजी वाणिज्य शाखेतील ऍडव्हान्स अकाऊंट या विषयाची परिक्षा होती.विद्यार्थ्यांना देण्यात आलेले प्रश्न पत्र मात्र जुने होते. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न पत्र सोडवले त्यानंतर पुन्हा ज्या 30 विद्यार्थ्यांना जुने प्रश्न पत्र देण्यात आले होते. त्या 30 विद्यार्थ्यांना नवीन प्रश्न संच देण्यात आला आणि विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा परिक्षा दिली. याबाबतची माहिती काही जणांना झाल्यानंतर त्यांनी याबाबत अगोदर प्राध्यापकांना आणि पुढे प्राचार्यांना विचारणा केली तेंव्हा प्राध्यापक तर क्षमा मागत होते आणि प्राचार्य महोदय विचारणा करणाऱ्यांना माणसाकडून कामात चुका होता असे सांगून वेळ मारतांना असेही सांगत होते की, परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्नसंच जुना आहे हे कळले नाही काय? या चर्चेचा एक व्हिडीओ सुध्दा उपलब्ध आहे.
