नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तुल बाळगुण वावरणाऱ्या 22 वर्षीय युवकाला स्थानिक गुन्हा शाखेने गजाआड करून त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक गुन्हा शाखेचे पेालीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी 4 डिसेंबर रोजी बळीरामपूर भागात त्या व्यक्तीचा शोध घेतला. त्याचे नाव नामदेव तुळशीराम शिवभक्ते (22) असे आहे. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे कंबरेला लावलेले एक गावठी पिस्टल सापडले या पिस्टलची किंमत 20 हजार रुपये आहे. पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांच्या तक्ररीवरुन नामदेव तुळशीराम शिवभक्तेविरुध्द नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर आदींनी सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे, सचिन सोनवणे, गोविंदराव मुंडे, पोलीस अंमलदार गुंडेराव कर्ले, बालाजी तेलंग, हेमवती भोयर, विलास कदम, गणेश धुमाळ, हेमंत बिचकेवार यांचे कौतुक केले आहे.
