नवीन नांदेड,(प्रतिनिधी)- शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार दुकाने फोडून चोरटयांनी जिल्ह्यातील सर्वात जास्त असलेल्या दमबाज पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोडबांड साहेबांना नवीन आव्हान दिले आहे.
नांदेड शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज ५ डिसेंबरच्या सूर्योदया अगोदर सिडको भागातील चार दुकाने फोडली आहेत. त्या भागातील ग्राहक सेवा केंद्र,अशोक गजभारे यांचे फायनान्स कार्यालय,येरावार यांचे किराणा दुकान आणि दमकोंडवार यांचे किराणा दुकान अशी ती ४ चोरटयांनी फोडलेली दुकाने आहेत.या दुकानांमधून किती ऐवज चोरटयांनी पळवला आहे याबाबत माहिती प्राप्त झालेली नाही.
परंतु नांदेड ग्रामीणचे मागील दोन वर्षांपासून तोंडी आदेशावर पोलीस ठाणे सांभाळणारे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांना चोरटयांनी दिलेले आव्हान नक्कीच महत्वपूर्ण आहे.
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 नव्हे तर 5 दुकाने फोडलीत
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचवे दुकान सुद्धा फोडण्यात आले आहे. ही माहिती बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्राप्त झाली. शहरातील कापूस संशोधन केंद्रा समोर सुद्धा आजचा सूर्योदय होण्या अगोदर एक ऑटोमोबाईल्सचे दुकान फोडले आहे. या दुकानातून किती ऐवज चोरीला गेला याची माहिती मात्र प्राप्त झाली नाही.
