सेवानिवृत्त पोलीस अंमलदार शेख अब्दुलचे कौतुक केले श्रीकृष्ण कोकाटेंनी
नांदेड,(प्रतिनिधी)- सध्याच्या धका धकीच्या काळात प्रमाणीक माणसे मिळणे हे दुरापास्त झाले आहे. परंतु नांदेड पोलीस दलातून निवृत्त झालेले पोलीस अंमलदार शेख अब्दुल शेख अमीर हे पोलीस कल्याण विभाग नांदेड यांच्या तर्फे चालविण्यात येणाऱ्या पोलीस पेट्रोल पंपावर स्वेछेने नागरीकांची सेवा करतात. ते तेथे गाईडचे काम करतात. चार दिवसा पुर्वी जेष्ठ नागरीक सुरेंद्र सोहनलाल अवस्थी, वय 62 वर्षे रा. तारासींह मार्केट नांदेड हे पेट्रोल भरण्यासाठी पोलीस पेट्रोल पंप येथे आले असता त्यांचे खिशातून 3 हजार 8 रूपये खाली पडले होते. ते पैसे निवृत्त झालेले पोलीस शेख अब्दुल शेख अमीर यांना मिळाले होते. सापडलेल्या पैशाच्या मालकाचा शोध घेणे सुरू झाला.
जेष्ठ नागरीक सुरेंद्र सोहनलाल अवस्थी, हे आज पेट्रोल पंपावर चौकशी करण्यासाठी आले असता शेख अब्दुल अमीर यांने त्यांना सापडलेले 3 हजार 8 रूपये त्यांचेच असल्याची खात्री केली. ती रक्कम श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड यांचे समक्ष कार्यालयात येवुन परत देण्या आली. असे प्रामाणीक व इमानदार पोलीस अंमलदार पोलीस दलात असुन प्रत्येकाने त्याचा आदर्श घेवुन काम केल्यास पोलीस दलाची प्रतिमा उंचावेल अशी भावना पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त करून शेख अब्दुल अमीर यांचे कौतुक केले.
