नांदेड(प्रतिनिधी)-असहकार आंदोलन करून नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तलाठ्यांनी सेवा शिस्त व अपील नियमांचा भंग केला. म्हणून त्या सर्व जवळपास 40 ग्रामसेवकांना निलंबित केल्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे.
दि.23 नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा नांदेड यांच्यावतीने असहकार आंदोलन करण्यात आले होते. जिल्ह्यातील 16 तालुक्यात त्यासाठी 24 नोव्हेंबरपासून असहकार आंदोलन सुरू होते. 28 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतसमोर एक दिवशीय धरणे आंदोलनही करण्यात आले होते.या असहकार आंदोलनामध्ये कार्यालयाच्या मासिक व पाक्षीक बैठकींवर बहिष्कार, वरिष्ठ कार्यालयास कुठल्याही प्रकारचे अहवाल न देणे, दप्तर तपासणीसाठी सहकार्य न करणे अशी दिशा होती. या अहसकार आंदोलनासाठी एकूण वेगवेगळ्या 25 मागण्या होत्या आणि असहकार आंदोलन कायम राहिल असे लिहिले होते.
या निवेदनावर ग्रामसेवक संघटनेतील धम्मानंद धोतरे, गोविंद माचनवाड, श्रीनिवास मुगावे, हणमंत वाडेकर, धनंजय वडजे, पी.जे.नागेश्र्वर, बी.डी.पाटील, जी.एस.शिंदे, एस.जे.सोनकांबळे, एस.एम. जेठेवाड, एस.एम.सरवर, एम.बी.देवकांबळे, एस.व्ही.पाटील, एम.टी.पाटील, जी.जी.गर्जे, के.एम. हमपले, कृष्णा रामदिनवार, एस.एम. पाटील, एम.व्ही. गायकवाड, व्ही. एम. हराळे, जे.जी.शिंदे, डी.बी. श्रीमंगले, के.के.खिंडे, जी.व्ही.देशमुख, व्ही.एस.मोरे, बी.आर.रेणकुंटवार, यु.एस.शिरसे, ए.जी.इंगळे, व्ही.एम.वडजे, व्ही.के.कल्याणकर, सचिन पाटील, आर.आर.श्रृंगारे, एस.ई.खेलमाडे, एच.एम.हळदे, आर.एम.बेंद्रीकर, पी.एम.जिरगे, एच.एच.शेख यांच्यासह एक स्वाक्षरी बिन नावाची आहे.
या संदर्भाने 6 डिसेेंबर 2022 रोजी जावक क्रमांक 3587/2022 प्रमाणे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्राम पंचायत यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेले एक पत्र प्राप्त झाले. या पत्रात असहकार आंदोलनात सहभागी होवून तालुकास्तरावर 28 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबर रोजी धरणे आंदोलनात सहभागी नगरसेवकांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दोन दिवसांचे वेतन कपात सुध्दा करण्यात आले आहे. या पत्रानुसार असे आंदोलन करून ग्रामसेवकांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद वर्तणूक नियम 1967 मधील नियम 3 चा भंग केला आहे. त्यामुळे या सर्व ग्रामसेवकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 नुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.हे पत्र गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेडच्या नावाने निर्गमित आहे. पत्राची प्रतिलिपी जिल्हाधिकारी नांदेड, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, पोलीस अधिक्षक नांदेड आणि जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना माहितीस्तव देण्यात आली आहे.
या पत्राची एक पत्र मनसेच्या जिल्हाध्यक्षांना का देण्यात आली याचा शोध घेतला असता 7 डिसेंबर रोजी मुखेड तालुक्यातील हंगरगा (प.के.) येथील पंचवार्षिक काळात झालेल्या विविध कामातील भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीची मागणी करण्यासाठी मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बैठा सत्याग्रह केला होता. 28 नोव्हेंबर रोजी अणि 2 डिसेंबर रोजी सुध्दा तलाठ्यांविरुध्द बैठा सत्याग्रह करण्यात आला होता. त्यामध्ये मनसेचे विनोद पावडे, अब्दुल शफीक, संतोष सुनेवाड, संतोष बनसोडे, शक्ती परमार, दिपक स्वामी, अनिकेत परदेशी, गोकुळ कौडगे, कल्पना देशमुख, शुभम पाटील, गणेश जोरगेवार, संध्या पंचभाई, बालाजी एकलारे, राम जाधव, अमर कोेंडराज, अविनाश वैष्णव आणि संघरत्न जाधव यांनी सहभाग घेतलेला होता. त्यासाठी जवळपास 40 तलाठ्यांच्या निलंबनाच्या आदेशाची एक प्रत मनसे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागिरदार यांना पण देण्यात आली आहे.
असहकार आंदोलन करणाऱ्या जवळपास 40 ग्रामसेवकांचे निलंबन