नांदेड,(प्रतिनिधी)-संत संताजी जगनाडे महाराज यांची 398 वी जयंती शहरातील प्रतिभानिकेतन महाविद्यालय येथे उत्साहात संपन्न झाली यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ गंगाखेडकर सर यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या बोलत असताना वेळी प्रा. बालाजी यशवंतकर यांनी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला व सोबतच त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे आव्हान त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले . यावेळी समजातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी मंठाळकर, आनंद वच्छेवार, उमेश मंठाळकर, गणेश बोडके, सुरेश यशवंतकर व महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Posts
‘स्वारातीम’ विद्यापिठामध्ये धान्यापासून खाण्यायोग्य प्लास्टिक निर्मितीचा शोध
नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र संकुलातील प्रा. डॉ. ओमप्रकाश येमूल यांच्या विद्यार्थी…
काल रात्री राबवलेल्या कोंबींग ऑपरेशनमध्ये पोलीसांची भरपूर मेहनत
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात गुन्हेगारांवर आळा बसावा या दृष्टीकोणातून काल रात्री राबविण्यात आलेल्या कोबींग ऑपरेशन दरम्यान पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात,…
लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 4 लाख 91 हजारांची लुट
नांदेड(प्रतिनिधी)-लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेस्टाहाऊस जवळ तिन जणांनी पेट्रोल पंपाचे नोकर याच्या हातातील 4 लाख 91 हजार रुपये रोख रक्कम…