नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या नवऱ्याला प्रियकर आणि मित्राच्या सहाय्याने किडनॅप करून त्याला मारहाण करणाऱ्या बायकोसह तिचा प्रियकर आणि इतर तीन जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सोनाली बिरहारी-जगताप यांनी आता न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात पाठवून दिले आहे. कारण या प्रकरणात भारतीय दंड संहितेचे कलम 364 जोडलेले आहे. त्यामुळे या प्रकरणात जामीन देण्याचा अधिकार हा जिल्हा न्यायालयांना असतो.
दि.1 डिसेंबर रोजी प्रकाश श्रीरामे यांची पत्नी गितांजली, तिचा प्रियकर आणि इतर तीन मित्रांनी मयुर विहार कॉलनीमधून किडनॅप केले आणि औंढा रस्त्यावर सोडून दिले. या दरम्यान त्या अपहरणकर्त्यांनी प्रकाश श्रीरामे यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 62 हजार रुपये घेतले असा प्रकार हा घडला होता. प्रकाश श्रीरामे आणि गितांजली या दोघांना आपल्या वैवाहिक जीवनात दोन आपत्य प्राप्त झाली आहेत. त्यातील एक 15 वर्ष आणि एक 10 वर्ष वयाची आहेत. पती-पत्नीच्या कलहात हा नवीन प्रकार घडला. गितांजलीबाबत काही पत्रकारांनी असा प्रचार केला होता की, ही बाई जज आहे. ही काहीपण करू शकते, तिचे विधी शिक्षण झाले आहे असे सांगितले होते. विधी शिक्षण झालेली महिला नक्कीच असा अपहरणचा प्रकार करणार नाही.
याबाबत प्रकाश श्रीरामे यांनी तक्रार दिल्यानंतर भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत फिल्मी स्टाईल पाठलाग करून प्रकाश श्रीरामेची पत्नी गितांजली पि.बळवंत हाके (35) तिचा प्रियकर बालाजी शिवाजी जाधव (28), दिलीपसिंग हरिसिंग पवार (29), अवतारसिंघ नानकसिंघ रामगडीया (38) आणि अमोल गोविंद बुक्तरे (26) अशा पाच जणांना दोन तासात गजाआड केले. न्यायालयाने पहिल्यांदा 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर, दुसऱ्यांदा 4 डिसेंबर ते 6 डिसेंबर आणि तिसऱ्यांदा 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर अशा सात दिवसांसाठी या पाच जणांना पोलीस कोठडीत पाठविले होते. आज दि.8 डिसेंबर रोजी तिसरी पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलीस उपनिरिक्षक सुनिल भिसे, त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कवडे आणि इतरांनी या पाच जणांना न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीसांनी मागितलेली पुढील तीन दिवसांची पोलीस कोठडी ना मंजुर करून आरोपींना न्यायालयीन कोठडीत घेतले. याप्रकरणात भारतीय दंड संहितेचे 364 जोडलेले आहे. ज्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा प्रस्तावीत आहे. या परिस्थितीत 364 प्रकरणातील आरोपींना जामीन देण्याचा अधिकार जिल्हा न्यायालयाला असतो. म्हणजेच आता गितांजली आणि तिचा प्रियकर आणि इतर तीन साथीदारांना तुरूंगात जावे लागणार आहे हे निश्चित.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2022/12/06/नवऱ्याला-पळवणाऱ्या-गितां/