आंतरविद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेत यजमान नांदेड सह पुणे, ग्वालियर, जयपूर, गोवा संघाची आघाडी

नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुरु असलेल्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धेच्या  (पुरुष) तिसऱ्या दिवशी सकाळच्या पहिल्या सत्रात एकूण १८ सामने खेळविण्यात आले.

देशभरातून आलेल्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्र्सिंह बिसेन आणि शिक्षणशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. सिंकू कुमार सिंह आपल्या सहकार्यासह मैदानात उपस्थित होते.

पेरूल विद्यापीठ बडोदा, विरुद्ध पीडीडी विद्यापीठ शेखावत यांच्यातील सामन्याने आज सकाळच्या सत्राचे शुभारंभ करण्यात आले. अत्यंत अतिटतीच्या सामन्यात पेरूल विद्यापीठाने बाजी मारली.

कल रात्री उशिरा झालेल्या सामन्यात मुंबई विद्यापीठ विरुद्ध पुणे विद्यापीठाचा सामना अत्यंत रोमांचक ठरला. ५ सेट पर्यंत चाललेल्या या सामन्यात मुंबई संघाने अत्यंत चपळतेने शेवटच्या क्षणी हा सामना जिंकला.

आज दुपारपर्यंतच्या सत्रात प्रवरा इन्स्टिट्यूट, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, पारूळ विद्यापीठ बडोदा, भारती विद्यापीठ पुणे, कुशलदेर विद्यापीठ हनुमानगडी, देवी अहिल्या विद्यापीठ इंदौर, आरडीव्हिव्हि विद्यापीठ जबलपूर, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, आरजीपीवी विद्यापीठ भोपाळ, मुंबई विद्यापीठ आदी. संघाने आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली आहे.

दिवस-रात्र प्रकाश झोतात चालणारे हे सामने बघण्याकरिता परिसरातील व्हॉलीबॉल प्रेमी मोठ्याप्रमाणात सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. मागील तीन दिवसापासून चालू असलेली सदर स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये  सुरु आहेत. आंतर राष्ट्रीय स्तरावरील मान्यता प्राप्त पंच अद्यावत मैदान आणि पूर्णवेळ सुसज्य असलेली वैद्यकीय सेवा ही या स्पर्धेची वैशिष्ठ्य ठरले आहे. असे क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *