वजिराबाद पोलीस ठाण्यात विशेष शाखेत पोलीस उपनिरिक्षक; ठाण्यात दोन हजेरी मेजर

नांदेड(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकच पोलीस ठाणे असे आहे की, ज्या पोलीस ठाण्यातील विशेष शाखेमध्ये पोलीस उपनिरिक्षक कार्यरत आहेत. नांदेड शहराच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात ही विशेष प्रथा आहे.सोबतच या पोलीस ठाण्यात हजेरी मेजर पदावर दोन पोलीस हवालदार कार्यरत आहेत.
राज्याच्या प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये विशेष शाखा असते. या शाखेवर पोलीस अंमलदार काम करतात. नांदेडच्या वजिराबाद पेालीस ठाण्यात मात्र अत्यंत इमानदार पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी अत्यंत तरुण असलेल्या पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे यांची नियुक्ती केली आहे. सोबतच काही पोलीस अंमलदार सुध्दा त्यांच्यासोबत देण्यात आले आहेत. पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे हे पोलीस शिपाई होते तेंव्हापासून आजपर्यंत जास्तीचा काळ त्यांनी विशेष शाखेत घालवलेला आहे. एका बंदुक प्रकरणात पोलीस निरिक्षकाच्या जागी स्वाक्षरी करून त्यांनी अहवाल सुध्दा पाठवलेला आहे आणि अशाच या कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरिक्षकांना आपल्या पोलीस ठाण्यातील विशेष शाखेची जबाबदारी देवून पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी चांगले काम करणाऱ्याला दिलेली संधी प्रशंसनिय आहे.
सोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात एक हजेरी मेजर असतो. त्यांची जबाबदारी असते की, त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनच्या आस्थापनेवर असलेल्या पोलीस अंमलदारांच्या कर्तव्यांचे वाटप पोलीस निरिक्षकांच्या आदेशाने करायचे आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यायचे.पण नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात अगोदरच पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतांना सुध्दा तेथे असलेल्या कामाच्या जास्त दबावाला नियंत्रीत करण्यासाठी दोन पोलीस अंमलदारांना हजेरी मेजर करण्यात आले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांशी अत्यंत प्रेमळ वागणूक देणाऱ्या पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या याही कामाची प्रशंसाच केली पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *