नांदेड(प्रतिनिधी)-बांधकामाचे साहित्य आणणारे एक वाहन झोपलेल्या 25 वर्षीय युवकाच्या अंगावरुन गेल्याने तो मरण पावला. लिंबगाव पोलीसांनी वाहन चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
लिंबगाव गावात लक्ष्मण उत्तम बेटके यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी लागणारे साहित्य जसे गिट्टी, रेती आणण्याचे काम एम.एच.04 एफ.जे.6407 चे चालक शंकर पवार यांच्याकडे होते. दि.12 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता हे वाहन साहित्य भरून आले आणि बेटके यांच्या घरासमोर रिक्यामे करण्यासाठी रिव्हर्स गेअरमध्ये टाकले. त्या ठिकाणी विशाल भुसावळे हा 25 वर्षीय युवक झोपलेले होता. नेमका तोच वाहन चालकाला दिसला नाही. त्याच्या अंगावरून वाहन गेल्याने भुसावळेचा मृत्यू झाला. विशाल भुसावळेच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर लिंबगाव पोलीसांनी वाहन क्रमांक एम.एच.04 एफ.जे.6407 च्या चालक शंकर पवार विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 304 (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. लिंबगाव पोलीसांनी वाहन ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार हे करीत आहेत.

विशाल भुसावळेचे मृत्यू झाल्यानंतरचे फोटो व्हायरल झाले. त्यावरून विशाल भुसावळेचा मृत्यू 12 डिसेंबरच्या पुर्वीच्या रात्री झालेला दिसतोय. पण पोलीस प्राथमिकीमध्ये या घटनेचा वेळ 12 डिसेंबर 2022 च्या दुपारी 1.30 वाजता दाखविण्यात आलेला आहे.