नांदेड(प्रतिनिधी)-एका ट्रक चालकाला फोन करून एका भामट्याने त्यांना आलेला ओटीपी प्राप्त करून त्यांच्या खात्यातून 1 लाख 42 हजार 800 रुपये काढून घेतल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत लोहा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुधाकर शिवाजी खेडकर हे ट्रक चालक आहेत. त्यांचे गाव खेडकरवाडी ता.लोहा हे आहे. दि.8 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आणि 9 मे 2022 रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या मोबाईल क्रमांक 9623496176 एका भामट्याने फोन केला. त्या भामट्याचा फोन क्रमांक 8240749422 असा आहे. भामट्याने सुधाकर खेडकर यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मागून घेतला आणि त्यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 42 हजार 800 रुपये वळती करून घेतले. लोहा पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 241/2022 फसवणूक आणि तंत्रज्ञानाचा गैरवापर या सदराखाली दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोहा येथील पोलीस निरिक्षक संतोष तांबे यांच्याकडे देण्यात आला आहे.
ट्रक चालकाकडून ओटीपी घेवून 1 लाख 43 हजार रुपये वळती