अधार्पूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील मालेगाव येथील पत्रकार तथा शिवसेना वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी सुभाशिष कामेवार (वय 35) यांचे दि. 21 डिसेंबर बुधवारी दुपारी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या घटनेमुळे मालेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे. सुभाशिष कामेवार यांना बुधवारी सकाळी छातीत दुखत असल्याने नांदेडच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पत्रकार आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते अशी कामेवार यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर दि. 22 डिसेंबर गुरुवारी सकाळी 10 वाजता त्यांच्यावर मालेगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन बहिणी असा परिवार आहे.
Related Posts
पोलीसांची धावपळ आणि डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल यांच्या प्रतिसादाने एका जखमीचा तुटलेला हात जोडला-श्रीकृष्ण कोकाटे
डॉ.देवेंद्रसिंह पालीवाल नांदेड(प्रतिनिधी)-माझ्या पोलीसांनी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त माणुसकीची जाण ठेवून एका जखमीसाठी केेलेली मेहनत भरपूर मोठी आहे. आज त्या…
सन 2024 मधील जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे आवाहन
नांदेड (जिमाका)- राष्ट्र पुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्यावतीने निर्देशित करण्यात आले आहे.…
शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाने 60 हजार रुपये किंमतीच्या 25 तलवारी पकडल्या
नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरात मागील 25 दिवसापासून पोलीस अवैध शस्त्र बाळगणाऱ्याविरुध्द कार्यवाही करत आहेत. आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने एका…