आंतर विद्यापीठ बाद फेरीच्या अंतिम सामन्यात मुंबई, नागपूर, पुणे, ग्वालियर आणि जयपूर संघाचा प्रवेश 

नांदेड (प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ महिला बॅडमिंटन स्पर्धेत मुंबई, नागपूर, पुणे, ग्वालियर आणि जयपूर संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करून बाद फेरीच्या अंतिम स्पर्धेसाठी प्रवेश केला. २२ डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने महाराजा गंगासिंग विद्यापीठावर २-० ने विजय मिळविला. आरटीएम नागपूर विद्यापीठ संघाने महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक संघाचा २-० ने प्रभाव केला. सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघाने मुंबई विद्यापीठावर २-१ ने मात केली. एलएनसीई ग्वालियर संघाने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघावर २-० ने सहज मात केली. राजस्थान विद्यापीठ जयपूर संघाने सिम्बॉयसिस विद्यापीठ पुणे संघावर २-० ने विजय मिळविला.

बाद फेरीतील आज शेवटचे सामने असून रात्री उशिरा साखळी सामने होऊन २३डिसेंबर रोजी स्पर्धेचा समारोप होणार असल्याचे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. विठ्ठलसिंह परिहार यांनी कळविले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *