नांदेड,(प्रतिनिधी)-आज दि. २४ डिसेंबर रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मालेगाव ता. अर्धापूर येथे कुटुंब कल्याण चा दुर्बीणद्वारे (लप्रोस्कोपी) शिबीर घेण्यात आले. ४९ महीलांचे दुर्बीण द्वारे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी अर्धापूर डॉ.आकाश देशमुख, डॉ श्रीकांत शिंगरवाड वैद्यकीय अधिकारी मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर घेण्यात आले. शिबीरात दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया डॉ बेले यांनी केल्या. कुटुंब कल्याण शिबीराचे नियोजन आरोग्य सहायक एस.पाटील, अरुण गादगे, आरोग्य सहाय्यीका श्रीमती कुलकर्णी, आरोग्य सेविका श्रीमती गुंडले, घनसरे पाटील, काळे, खुळे, टीमके आरोग्य कर्मचारी व्यंकटी बकाल, वसंत शिरसे, प्रदीप गायकवाड, बालाजी राऊत व सर्व आशा यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
Related Posts
जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 37.60 मि.मी. पाऊस
नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सोमवार 4 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 37.60 मिलीमीटर पावसाची नोंद…
तत्पर व युध्दपातळीवरील आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे विष बाधेतील बाधित रुग्णांची प्रकृती स्थिर
जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाशी समन्वय साधत तातडीने उपचाराचे केले नियोजन लोहा तालुक्यातील अन्न विषबाधित झालेले सर्व रुग्ण सुखरुप नांदेड (प्रतिनिधी…
नांदेड जिल्ह्यातील त्या 22 बालकांना हृदय शस्त्रक्रियेसाठी आचार्य विनोबा भावे रुग्णालय वर्धाकडे केले रवाना
▪️राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचार ▪️जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे संपूर्ण जिल्हाभर मुलांची तपासणी करून केली निवड नांदेड, (जिमाका) – राष्ट्रीय…