..चिखलीकर साहेब स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीसाठी स्वत:च वारसदार निवडा

नांदेड(प्रतिनिधी)-आज चौथ्या वर्षाच्या स्थानिक गुन्हा शाखेतील पहिला दिवस असणाऱ्या पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासाठी असे म्हणायचे आहे की, जीवनातील प्रत्येक घटनेच्या मर्यादा ओळखल्या पाहिजे. म्हणून आपल्या समक्षच स्थानिक गुन्हा शाखेचा वारसदार आपणच शोधा आणि त्याला नवीन जबाबदारीसाठी शुभकामना द्या.

द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या जीवनाची 1094 दिवसे अर्थात तीन वर्ष स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीला न्याय देत पुर्ण केली. या कालखंडामध्ये आपण केलेल्या जोरदार कामगिरीचा उल्लेख आम्ही कालच केलेला आहे.शासन निर्णय, पोलीस महासंचालक कार्यालयाचे परिपत्रक यानुसार आपण स्थानिक गुन्हा शाखेतील विहित वेळ पुर्ण केलेला आहे. आजच्या दिवशी आम्हाला आपल्या समक्ष हे जरुर मांडायचे आहे की, कधी-कधी आपण स्वत: एखादी जागा सोडून देणे हे आपल्या पुढील जीवनासाठी उत्कृष्ट असते. कारण आपल्याला या ठिकाणी झालेली तीन वर्षे आपल्याबद्दल उगीचच का होईना आपल्या विरोधकांची संख्या वाढवणारी आहे. जीवनात चालत असतांना आपले मोठे मन ठेवले तर आपले जीवन तितकेच सोपे होते. या विचारानुसार आपण मोठे मन ठेवून सर्व साधारण बदल्या कधी होतील, पुढे आपल्याला खुप कमी वेळ शिल्लक आहे. त्याचा सुध्दा विचार न करता आपण या पदाला सन्मानपुर्वक सोडावे अशी आमची इच्छा आहे. कारण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा सुगंध वाऱ्यासोबत आपोआप पसरत जातो. आपल्या कर्तत्वाचा सुंगध मागील तिन वर्षाच्या काळात नांदेड जिल्हा पोलीस दलाने, नांदेड जिल्ह्यातील जनतेने आणि महाराष्ट्राने सुध्दा पाहिलेला आहे. आपल्याला उत्कृष्ट तपासासाठी पोलीस महासंचालकांनी सन्मान केलेला आहे. त्यामुळे आपल्या जीवनाचा उर्वरीत पोलीस कार्यकाळ हा हसत-खेळत, इतरांना मार्गदर्शन करत पुढे-पुढे जावा अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात आज असे अनेक पोलीस निरिक्षक आहेत ज्यांची पोलीस सेवा संपून दहा वर्षांचा कार्यकाळ झाला आहे. तरीपण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये त्यांच्या बुध्दी चातुर्याची गरज पडते तेंव्हा त्यांना बोलावलेच जाते. एक पाण्याचा थेंब असतो तो जेंव्हा मिसळतो तर त्याचा समुद्र तयार होतो. एक धागा असतो तो एकमेकांशी जोडला जातो तेंव्हा ती चादर बनते. एक कागद असतो ते एक दुसऱ्याशी जोडले गेले तर पुस्तक तयार होते अशा पध्दतीने आपल्याला आता जुळवा-जुळव करण्याच्या मनस्थितीप्रमाणे तयार व्हायला हवे.

आपण स्थानिक गुन्हा शाखेच्या पदावर तीन वर्ष गाजविली आहेत. आता स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर बसणाऱ्याने आपला सन्मान केला पाहिजे अशी जागा शोधा. आणि त्या जागेवर आपला हक्क सांगा. कारण आपल्या जीवनातील गंतव्य स्थानापेक्षा आपला प्रवास सुंदर झालेला आहे.आता याच्या आठवणी तयार करायच्या आहेत आणि या आठवणी आपल्याला नेहमी आनंद देतील. त्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेचा वारसदार आपण स्वत: शोधला पाहिजे आणि त्या वारसदाराची शिफारस केली पाहिजे. मागे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचा वारसदार सुध्दा अशाच पध्दतीने शोधला गेला होता परंतू वारसदाराने बेईमानी केल्यामुळे त्यांना पुढे त्रासच झाला होता. पण ज्याने वारसदार शोधला होता त्यांचा सन्मानच झाला. जगात तीन लोक सर्वात छान आहेत पहिला ज्याचा मृत्यू झाला आहे दुसरा जो अजून जन्मालाच आला नाही आणि तिसरा ज्याला आपण ओळखत नाही.. आपण पोलीस आहात पोलीस जीवनाची संपूर्ण गाथा आपण पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे आणि त्यातून मार्गक्रमण केलेले आहे. हे मार्गक्रमण करतांना आपल्याला त्रासही भरपूर झाले त्या त्रासांना उत्तरे देतांना आता आपण आपल्यानंतरच्या पोलीसांना मार्गदर्शक झाला आहात आणि हे मार्गदर्शक पद आपल्या जीवनात कायम राहावे म्हणूनच आम्ही विनंती सार्वजनिक रित्या प्रसारीत करीत आहोत. माणुस काय आहे हे महत्वाचे नाही पण माणसामध्ये काय आहे हे खुप महत्वाचे आहे.. या शब्दांप्रमाणे आपल्यात काय आहे हे जगाने ओळखलेले आहे. त्यामुळे आता ओळखीची गरज शिल्लक राहिलेली नाही. फक्त तयार झालेल्या ओळखीला टिकवून ती ओळख दुर पर्यंत घेवून जाण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही पण ते का ओळखतात याला नक्कीच महत्व आहे… आपल्या किती लोक ओळखतात हे आम्ही लिहायचे काय? पण त्यांच्या ओळखीमधील महत्व आम्हाला नक्कीच माहित आहे. ही माहिती सार्वजनिक व्हावी हा सुध्दा आमचा हेतू आहे. आपण स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीवर येणार होतात तेंव्हा आज आपले सेवक असलेले आपल्या विरुध्द किती बोलले होते याचे अनेक साक्षीदार कक्ष क्रमांक 11 मध्ये आहेत.त्या परिस्थितीत सुध्दा आपण तीन वर्ष पुर्ण केलात याचे कौतुक करतांना आम्हाला असे म्हणायचे आहे की, बेशुमार सा कुछ लिखना था.., मैंने आप पर एतबार लिख दिया.आपण स्थानिक गुन्हा शाखेची खुर्ची सांभाळतांना केलेले प्रयत्न आणि सोडवलेल्या अडचणी आम्हाला अशा शब्दात सांगायच्या आहे की, वेळ हा बहिरा आहे तो कोणाचे ऐकत नाही पण तो अंध नक्कीच नाही तो सगळ्यांना पाहत असतो. आणि म्हणूनच काही लोकांपासून ईश्र्वर आपल्याला दुर करतो याचे कारण आपल्या जीवनात त्यांच्यामुळे काही व्यत्यय येवू नये. काही विचारवंत सांगतात चक्रव्युह रचणारे आपलेच असतात.. काल सुध्दा हेच सत्य होतं.. आणि आज सुध्दा हेच सत्य आहे.. म्हणून आम्ही केलेल्या शब्दप्रपंचाला सकारात्मकपणे घ्या म्हणजे आम्ही केलेली मेहनत करतब ठरेल नसता हा अपघात असेल.

एकूणच अखेर आम्हाला असे म्हणायचे आहे की, स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीला खऱ्या अर्थाने न्याय देणारा वारसदार आपण स्वत: शोधा आणि त्याच्याच हक्कात हा निर्णय येईल यासाठी प्रयत्न करा. आमच्या शब्दांमुळे आपल्याला कुठे वाईट वाटले असेल तर आम्ही सांगू इच्छीतो की, आम्ही खुप स्वस्त आहोत फक्त गोड शब्द बोलून आपण आमची खरेदी केलेली आहे.आम्ही सार्वजनिकरित्या केलेली विनंती आपण मान्य करावी ही विनंती करतांना आम्ही लिहिलेल्या या शब्दांबद्दल आम्हाला एका विचारवंतांचे वाक्य उल्लेखीत करावे वाटते तो सांगतो की, दर्द मेरा तु नहीं समझा तो फिर समझेगा कौन, मेरे हकमें तु नहीं बोला तो बोलेगा कौन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *