नांदेड(प्रतिनिधी)-व्हॉटऍपच्या माध्यमातून एका शिक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न 11 महिन्यात झाला. या कटामध्ये आई , तिची मुलगी आणि तिसरा एक असे तीन लोक सहभागी आहेत अशा आशयाचा अर्ज न्यायालयाने मंजुर केल्यानंतर भाग्यनगर पोलीसांनी आई, मुलगी आणि त्यांचा एक साथीदार अशा तिघांविरुध्द जिव घेणा हल्ला या सदरात गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षक असलेले विजयकुमार शिवलिंगअप्पा गोंगणे यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार 23 फेबु्रवारी 2020 ते 1 जानेवारी 2021 या 11 महिन्याच्या दरम्यान आंबाबाई विठ्ठल बंडेवार (37), त्यांची मुलगी अश्विनी विठ्ठल बंडेवार (21) दोघे रा.जांब ता.मुखेड आणि साथीदार बुध्दभुषण जोंधळे रा.राजवाडी ता.मुदखेड यांनी व्हाटसऍपच्या माध्यमातून संपर्क करून विजयकुमार गोंगणेच्या खुन करण्याचा प्रयत्न केला. कारण विजयकुमारने बंडेवार आई आणि मुलीला उसने दिलेले 10 लाख रुपये परत मागत होता.
न्यायालयाच्या आदेशानंतर भाग्यनगर पोलीसांनी तिघांविरुध्द भारतीय दंडसंहितेच्या कलम 307, 120(ब), 34 आणि तंत्रज्ञान कायदा कलम 66 (ब) नुसार गुन्हा क्रमंाक 213/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु सोळंके हे करीत आहेत.
व्हॉटसऍपच्या माध्यमातून शिक्षकाचा खून करण्याचा प्रयत्न