नांदेड(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा अर्धापूर येथे हजेरी पटाची 11 पाने कोणी तरी फाडून त्याला जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा अहवाल मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कन्या यांनी गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर यांना पाठवला आहे.
अर्धापूर येथील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी पाठवलेल्या अहवालाल असे नमुद आहे की, 23 डिसेंबर रोजीच्या शिक्षक हजेरी पटावर तीन महिला शिक्षक वगळता सर्वांनी स्वाक्षऱ्या केल्या होता. मी दुपारी जेवनासाठी घरी गेलो. त्या दिवशी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मिटींगला जायचे होते म्हणून पुन्हा शाळेत आलो. तेंव्हा टेबलावर ठेवलेले शिक्षकांचे हजेरी पट पाण्यात भिजत असल्याचे दिसले. भिजलेले हजेरी पट वाचविण्यासाठी मी पाने चाळत होतो तेंव्हा त्यातील 11 पाने फाडलेले लक्षात आले. मी त्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांच्या मिटींसाठी गेलो. परत येण्या अगोदर एका शिक्षकाने मला फोनवरून सांगितले की, शिक्षक हजेरी पटाची पाने जळालेल्या अवस्थेत सापडल्याचे सांगितले. म्हणून मी आपल्या समक्ष हा अहवाल योग्य कार्यवाहीसाठी पाठवत आहे. दि.23 डिसेंबर रोजीच हा अहवाल गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्धापूर यांना मिळाला असल्याची नोंद सुध्दा आहे. पण कार्यवाही काय झाली याबद्दल माहिती प्राप्त झाली नाही.
जि.प.कन्या शाळा अर्धापूर येथे शिक्षक हजेरी पटाची 11 पाने फाडून जाळली