नांदेड(प्रतिनिधी)-कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने कृषी विभागाच्या क्रिडा महोत्सवात जल्लोष साजरा करतांना नृत्य करत हातात घेतलेली पिस्तुल आता चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. अद्याप मात्र पोलीस दप्तरी याची काही नोंद नाही.
नांदेड कृषी विभागाच्यावतीने वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले होते. या तीन दिवसांच्या सांस्कृतीक कार्यक्रमात विविध खेळ प्रकार घडले आणि रविवार दि.24 डिसेंबर रोजी या कार्यक्रमाची सांगता कुसूम सभागृहात जल्लोषाने झाली. यात संगीत नृत्य असे अनेक प्रकार घडले. कृषी विभागाचे कृषी अधिक्षक रविशंकर चलवदे यांच्या समक्ष आणि कृषी विभागातील असंख्य लोकांसमोर भोकर कृषी विभागातील अधिकारी काकडे यांनी हातात पिस्तुल घेवून रंगमंचावर नृत्य प्रकारात सहभाग घेतला. या संदर्भाचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर कृषी विभागाची ही पिस्तुल चौकशीच्या घेऱ्यात सापडली. या संदर्भाची माहिती पोलीसांपर्यंत पोहचली तेंव्हा पोलीसांनी आज त्या संदर्भाची चौकशी केली. पण या चौकशीतून अद्याप, वृत्तलिहिपर्यंत काही एक निश्चित घटनाक्रम उघडकीस आलेला नाही. आज शिवाजीनगर पोलीसांनी कृषी विभागातील अनेकांचे जाब जबाब नोंदवले आहेत. पण या काकडे नावाच्या अधिकाऱ्याच्या हातात ही पिस्तुल छायाचित्रात दिसते ते मात्र पोलीसांसमक्ष आले नाहीत. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आजच पोलीसांसमक्ष हजर होणार आहेत. त्यानंतर या कार्यवाहीला पुढे मार्ग सापडेल. व्हायरल झालेले बंदुकसहचे चित्र काही बंदुकीच्या जानकारांना दाखवले तेंव्हा या चित्रात दिसणारी बंदुक ही खरी बंदुक आहे असे चित्रावरून तर सांगता येणार नाही असे त्यांनही सांगितले.
कृषी अधिकाऱ्याच्या हातातील पिस्तुल आता चौकशीच्या फेऱ्यात