आधार नोंदणी करून दहा वर्षे झालेल्या नागरिकांनी केवायसी अपडेट करून घेणे आवश्यक- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड (प्रतिनिधी)- ज्या नागरिकांनी आधार नोंदणी करून दहा वर्षे पूर्ण केले आहेत, त्यांनी आपले आधार केवायसी अपडेट करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय आधार समितीचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले.

या आधार नोंदणीबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाचे उपसंचालक यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी आधारबाबत काही समस्याचे निराकरण करण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1947 व ईमेल आयडी help@uidai.in  यावर संपर्क करावा. आधार सेवेसाठी शुल्क ही पुढीलप्रमाणे आहे. नवीन आधार नोंदणी व अनिवार्य बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय ही मोफत आहे. डेमोग्राफिक अपेडट नाव, पत्ता, जन्म दिनांक, लिंग, मोबाईल क्रमांक, ई-मेलसाठी 50 रुपये तर बायोमॅट्रिक अपडेट डेमोग्राफिक अपडेटसह किंवा त्याशिवाय शंभर रुपये शुल्क आहे. एकाचवेळी किंवा त्यापेक्षा जास्त माहिती बायोमॅट्रिक / डेमोग्राफिक अपडेट करणे ही एकच विनंती मानली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *