नांदेड(प्रतिनिधी)-एका विहितेने विहिरीत उड्डी मारून जिव दिल्यानंतर सासरच्या मंडळीविरुध्द आत्महत्येच प्रवृत्तकरणे या सदराखाली मनाठा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गंगाधर किशन खोकले रा. डाक्याची वाडी ता.हदगाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 25 डिसेंबरच्या रात्री 10 ते 26 डिसेंबरच्या सकाळी 8.30 वाजेदरम्यान संतोष बाजीराव कदम यांच्या शेतात सुलोचना गजानन उर्फ नेमाजी पोत्रे या 30 वर्षीय महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही आत्महत्या नवरा गजानन उर्फ नेमाजी आणि सासरा तुकाराम विक्रम पोत्रे आणि सासू सुशिलाबाई तुकाराम पात्रे यांनी माहेरहुन वारंवार पैसे आणण्यासाठी लावलेल्या तगाद्याला कंटाळून केली आहे. मनाठा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 187/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 306, 498(अ), 323 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक चिटेवार हे करीत आहेत.
विवाहितेने विहिरीत उडीमारून जीव दिला