नांदेड(प्रतिनिधी)-प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांच्या सेवकाने सांगितल्यानंतर मला मारहाण झाल्याची तक्रार एका महिलेने दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी चार जणांना अटक केली आहे. त्या दोन पुरूष आणि दोन महिला आहेत.
पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणच्या हद्दीत राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिने तक्रार दिली की, 27 डिसेंबर रोजी दुपारी नागार्जुन हॉटेलजवून जात असतांना एका ऍटोने त्यांना कट मारला. याबाबत विचारणा केली असता ऍटोमधील लोकांनी त्या महिलेला ऍटोत कोंबून सोबत नेले आणि लाकडी बांबुने मारहाण करून सायंकाळी सोडून दिले. शिवाजीनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 454/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 365, 324, 109, 506 आणि 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक माने यांच्याकडे देण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच शिवाजीनगर पोलीसांनी तक्रारीतील मुजाहित अब्दुल खादर पठाण, त्याची पत्नी अंजुम बेगम मुजाहित पठाण, ऍटो चालक समिर मुर्तुजा पंजारीआणि तनिजाबी उर्फ मुन्नीबाई बाबू शेख असे दोन पुरुष आणि दोन महिलांना अटक केली आहे.
महिलेला ऍटोत कोंबून लाकडाने मारहाण; दोन महिला आणि दोन पुरूषांना अटक