नांदेड(प्रतिनिधी) – देशाच्या सेवेसाठी विरमरण पत्कारणार्या शहीद सुधाकर शिंदे यांच्या कुटूंबियांनी सेवेचा वारसा कायम ठेवला आहे. शहीद सुधाकर शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी येथील सुमन बालगृहात अनाथ बालकांना पुस्तके वाटप केली.
शहीद सुधाकर शिंदे हे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असता. याच दरम्यान नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ते शहीद झाले. त्यांच्या समाजसेवेचा वसा कायम ठेवत त्यांच्या पत्नी सुधा शिंदे, मुलगा कबीर शिंदे व मुलगी काव्या शिंदे यांनी शहरातील सुमन बालगृहातील अनाथ बालकांना प्रेरणादायी पुस्तके वाटप केली. यावेळी यशपाल भोसले यांच्यासह बालगृहाच्या सौ. दिनकर उपस्थित होत्या.
शहीद सुधाकर शिंदे यांच्या वाढदिवानिमित्त बालगृहास पुस्तके भेट