1 लाख 10 हजार रुपयांचे पशुधन चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे वाळकी फाटा शिवारात एका जिनिंग आणि प्रेसिंग कंपनीचे शटर तोडून 70 हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. तसेच मोखांडी ता.भोकर शिवारातून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरीला गेले आहे.
भास्कर सुभाषराव वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारीच्या रात्री 8 ते 8 जानेवारीच्या सकाळी 10 वाजेदरम्यान वाळकी फाटा येथील जयकेदारनाथ जिनिंग ऍन्ड प्रेसिंग या कंपनीचे शटर तोडून त्यातील 70 हजार रुपयांचे साहित्य कोणी तरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले आहे.हदगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड हे करीत आहेत.
विजेश तुकाराम पवार यांच्या मेहुणा भगवान शिवलाल राठोड यांच्या मोखंडी ता.भोकर शिवारातून पाच जणंानी दोन गायी एक गोरा अशी तीन जनावरे, 1 लाख 10 हजार रुपये किंमतीची चोरून नेली आहेत. याप्रकरणी भोकर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार आर.आर.जंकुट अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *