फायरिंग गुन्ह्यातील एकाला पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-कट रचून फायरिंगचा खोटा गुन्हा करणाऱ्या एकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भिनी इंबिसात देशमुख यांनी एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
9 जानेवारी रोजी रात्री सविता गायकवाड या महिलेने आपल्यावर गोळीबार झाल्याचा गुन्हा दाखल केला.पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीसांनी या गोरीबारातील सत्य घटना घडल्यानंतर 48 तास पुर्ण होण्याअगोदरच शोधले. या प्रकरणात एकूण चार साथीदारांच्यामदतीने सविता गायकवाड यांनीच घडविलेला आहे.याबाबत अवधुत दासरवाड आणि मोरेने या गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिल्याची प्रेसनोट काल पोलीस विभागाने जारी केली होती. त्यातील दोन जणांना पकडल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरिक्षक पांडूरंग माने यांच्या तक्ररीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात अवधुत उर्फ लहुजी गंगाधर दासरवाड (23) याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्या कलम 3/25 नुसार गुन्हा क्रमांक 14/2023 दाखल करण्यात आला. आज नांदेड ग्रामीणचे पोलीस उपनिरिक्षक आनंद बिचेवार आणि त्यांच्या सहकारी पोलीस अंमलदारांनी न्यायालयासमक्ष सांगितलेल्या युक्तीवादानुसार अवधुत दासरवाडकडून एक अग्नीशस्त्र(पिस्तुल, गावठी कट्टा) आणि चार जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही पिस्तुल कोठून आणली याची माहिती काढायची आहे यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. न्यायालयाने अवधुत दासरवाडला एक दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *