नांदेड(प्रतिनिधी)-बाऱ्हाळी गावात 12 जानेवारी रोजी झालेली चोरी ही 17 लाखांच्या ऐवजाची नसून फक्त 3 लाख 49 हजार रुपयांचा ऐवजाची चोरी आहे.
आज वास्तव न्युज लाईव्हने प्राप्त झालेल्या माहितीनुसार बाऱ्हाळी गावातील नंदकुमार गबाळे यांच्या घरात घुसून तिन दरोडेखोरांनी 5 लाख रुपये रोख रक्कम आणि 22 तोळे सोन्याचे दागिणे ज्यांची आजच्या दराप्रमाणे किंमत 11 लाख रुपये होते. अशा आशयाची बातमी प्रसिध्द केली होती. त्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस विभागाने पाठविलेल्या प्रेसनोटनुसार बाऱ्हाळी येथील शिक्षिका प्रमोदीनी नंदकुमार गबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दरोडेखोरांनी त्यांच्या कपाटातील 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम आणि 1 लाख 89 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे असा एकूण 3 लाख 49 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. मुक्रामाबाद पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 8/2023 भारतीय दंड संहितेच्या कलम 392, 394 प्रमाणे दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास मुक्रामाबादचे सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.यु.जाधव हे करत आहेत.
संबंधीत बातमी…
https://vastavnewslive.com/2023/01/13/शिक्षक-पती-पत्नीच्या-घरा/