नांदेड(प्रतिनिधी)-पुणे शहरात पोलीसांच्या कामगिरीत सातत्य वाढावे यासाठी 8 प्रकारच्या विविध कामांसाठी त्यांना बक्षीसे मिळणार आहेत असा आदेश अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर येथील रंजन कुमार शर्मा यांनी जारी केला आहे. या आदेशाताला अनुरूप राज्यभरातील पोलीस घटक प्रमुखांनी अशी बक्षीस योजना जाहीर केली तर पोलीस जास्त जोमात काम करतील.
20 जानेवारी 2023 रोजी अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार शस्त्र अधिनियमातील कलम 3/25 ची कार्यवाही करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना 10 हजार रुपये बक्षीस मिळेल. शस्त्र अधिनियम कलम 4/25 नुसार कार्यवाही करणाऱ्यांना 3 हजार बक्षीस मिळेल. फरार आरोपीला पकडणाऱ्यांना 10 हजार बक्षीस मिळेल. पाहिजे असलेले आरोपी पकडणाऱ्यांना 5 हजार रुपये बक्षीस मिळेल. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम अर्थात मकोका कार्यवाही करणाऱ्या पोलीसांना 5 हजार रुपये बक्षीस मिळणार. महाधोकादायक व्यक्ती अशा कृत्यांना आळा घालणारा कायदा एमपीडीए यातील कार्यवाही करणाऱ्यांना 5 हजार रुपये बक्षीस मिळणार. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार कार्यवाही करणाऱ्यांना 2 हजार रुपये बक्षीस मिळणार. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56/57 नुसार काम करणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांना 1 हजार रुपयांचे बक्षीस मिळणार.
ही बक्षीस योजना पुणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना आणि पोलीस अंमलदारांना दाखवून त्यांना उत्कृष्ट काम करण्यास प्रोत्साहित करावे असे चुवले आहे. सोबतच बक्षीस पत्र तयार करतांना त्या कामातील प्रत्येक व्यक्तीची भुमिका सविस्तर नोंद करून बक्षीस पत्र सादर करावे असे म्हटले आहे.
पोलीस आयुक्त कार्यालय पुणे यांनी जारी केलेल्या बक्षीस योजनेप्रमाणे राज्यभरातील प्रत्येक पोलीस घटकप्रमुखाने आपल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना अशा बक्षीस योजना जाहीर कराव्यात जेणे करून राज्यभरातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार उत्कृष्टपणे काम करतील.
अशी बक्षीस योजना नांदेड जिल्ह्यात जाहीर झाली तर नांदेड जिल्हा पोलीस दलाने मागील दोन वर्षात असंख्य बंदुका पकडल्या आहेत. मकोकाचे अनेक खटले दाखल केले आहेत. असंख्य फरारी आरोपी पकडले आहेत. या सर्वांचा गुणाकार केला तर नांदेड जिल्हा पोलीस दल बक्षीस मिळविण्यात राज्यात प्रथम क्रमांकावर येईल.
पुणे पोलीसांसारखी बक्षीस योजना राज्यभर लागू व्हायला हवी