नांदेड महानगरपालिकेतील गुंठेवारी संचिकेतील घोटाळे असतांना निविदेत खोटे अनुभव प्रमाणपत्र दिल्याचा नवीन प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-महानगरपालिकेतील गुंठेवारी संचिकेचा खोटारडेपणा अद्याप पुर्णपणे समाप्त झाला नाही तर एका निविदाधारकाने खोटे अनुभव प्रमाणपत्र दिल्याबाबत गुन्ह्याची नोंद झाली आहे.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतून पाणी पुरवठा विभागासाठी 18 जुलै 2022 रोजी निविदा काढण्यात आली होती. त्यामध्ये संजीव रामचंद्र दुबे (49) रा.मोंढा परळी वैजनाथ ता.अंबेजोगाई जि.बीड यांनी एक निविदा प्राप्त केली होती. निविदेच्या अटीप्रमाणे त्यात कामाच्या अनुभवाची गरज होती. संजीव रामचंद्र दुबे यांनी मे.चिंतामणी केमिकल कॉर्रेपोरेशन परळी यांचे प्रमाणपत्र दिले होते. या प्रमाणपत्राच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिकेने नगर परिषद कळंब जि.उस्मानाबाद, नगर परिषद कार्यालय उमरगा जि.उस्मानाबाद व अंबेजोगाई नगर परिषद यांच्यासोबत पत्र व्यवहार केल्यानंतर हे अनुभव प्रमाणपत्र खोटे आणि बनावट असल्याचे दिसले. त्यानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता संघरत्न गणपतराव सोनसळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वजिराबाद पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक प्रविण आगलावे यांच्याकडे देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *