नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका महिलेची अडीच तोळे सोन्याचे मिनी गंठण चोरट्यांनी तोडले आहे. तसेच महिला बचत गटाचे पैसे घेवून परत येणाऱ्या एका व्यक्तीला भोकर-मुदखेड रस्त्यावर लुटण्याचा प्रकार घडला आहे. तसेच लोहा शहरातील बसस्थानकातून एका महिलेच्या पर्समधून चोरी झाली आहे. या तिन प्रकारात मिळून जवळपास 4 लाख 50 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.
सौ.निता विनोद कत्ते या शिक्षीका दि.24 जानेवारीच्या रात्री 9.45 च्या सुमारास हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपवून आपल्या घराकडे जात असतांना रस्त्यातील पाथरकर यांच्या घरासमोर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या पाठीमागून त्यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे मिनीगंठण, किंमत 1 लाख 20 हजार रुपये असा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पेालीस निरिक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.
राम कैलास जाधव हे भारत फायनान्स हैद्राबादच्यावतीने नांदेड जिल्ह्यात फिल्ड असिस्टंट पदावर काम करतात. दि.25 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजेच्यासुमारास ते वेगवेगळ्या महिला बचत गटातील पैशांची वसुली करून आपली दुचाकी क्रमांक एम.एच.29 बी.एन.4679 वर बसून परत येत असतांना मुदखेड भोकर रस्त्यावरील कॅनल उताराजवळ दोन दुचाकीवर तीन जण पाठीमागून आले आणि त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्याकडील बचत गटाचे जमा केलेले पैसे, त्यांचे स्वत:चे रोख पैसे, बायोमॅट्रीक डिवाईस आणि एक टॅब असा 1 लाख 48 हजार 571 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. मुदखेड पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे अधिक तपास करीत आहेत. .
दि.25 जानेवारी रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेदरम्यान कमलाकरराव विठ्ठलराव इंदुरीकर हे 75 वर्षीय व्यक्ती आपल्या पत्नी नंदासोबत थांबले होते.तेंव्हा नांदेडकडे जाणारी बस आली आणि त्यात वर जाण्याचा घाईचा फायदा उचलून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या बॅगमधील सोन्याच्या साहित्याची डबी काढून घेतली. त्यात 1 लाख 87 हजार 500 रुपयांचे दागिणे होते. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
दोन जबरी चोऱ्या, एक चोरी; 4 लाख 50 हजारांचा ऐवज लंपास