नांदेड(प्रतिनिधी)-शहरात कायदा व सुव्यवस्थेवर नजर राखण्यासाठी पोलीस दलामध्ये गस्त हा प्रकार आहे.या पध्दतीने नांदेड जिल्ह्यात दाखल झालेल्या नवीन दुचाकी गाड्या जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखवून या दुचाकी गाड्यांना आपली जबाबदारी पार पाडण्याच्या कामगिरीवर रवाना केले.
26 जानेवारी रोजी शासकीय ध्वजवंदन झाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नवीन आलेल्या 20 दुचाकी गाड्यांना गस्तीवर पाठविण्यासाठी हिरवी झेंडी दाखविण्यात आली. या दुचाकी गाड्या अत्यंत नाविन्यपुर्ण असून त्यात पोलीसांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी जोडण्यात आल्या आहेत. यामुळे गर्दीत उदभवणारे प्रकार, महिलांना सुरक्षा वाटावी, नागरीकांना निर्भपणे संचार करता यावे, मुलींची छेडखानी, चैनस्नॅचिंग अशा अनेक गुन्ह्यांवर या गस्ती दुचाकी गाड्यांमुळे नक्कीच वचक बसणार आहे.
शहरात गस्त करतील नवीन 20 दुचाकी गाड्या